Dowry case : देशातील हुंडा घेण्याच्या पद्धतीमुळे उत्तरप्रदेशात आणखी एक झोप उडणारा प्रकार घडलाय. हुडा घेण्यासाठी एका सूनेवर भयंकर प्रयोग करण्यात आलाय. ही घटना उत्तर प्रदेशातील हरिद्वारमध्ये घडलीये. सहारनपूरमधील पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील एका व्यक्तीने त्याच्या मुलीचा विवाह 15 फेब्रुवारी 2023 रोजी हरिद्वारच्या अभिषेक उर्फ सचिन याच्यासोबत लावला होता. मुलीच्या वडिलांनी लग्नात भरभरुन हुंडा दिला. यामध्ये 15 लाख कॅश, कार, सोने-चांदीचे दागिने यांचा समावेश होता. सर्व हुंडा देऊन मोठ्या हॉलमध्ये त्यांचा विवाह पार पडला होता. मात्र, विवाहाच्या काही दिवसापर्यंतचं मुलगी व्यवस्थित राहिली. त्यानंतर लगेच मुलाकडील लोकांनी अधिक आणि वाढीव पैशांची मागणी सुरु केली.
हुंडा दिला नाही म्हणून एचआयव्ही संक्रमित इंजक्शन दिलं
पैशाची मागणी पूर्ण न झाल्याने त्यांनी विवाहितेला मारहाण सुरू केल्याचा आरोप आहे. त्यामुळे विवाहित महिला आजारी पडू लागली. तिला डॉक्टरांनाही दाखवले नाही. विवाहितेच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीची अवस्था पाहून तिला डॉक्टरांकडे नेले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. चाचणी केली असता विवाहित महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. सासरच्यांनी विवाहितेला इंजेक्शन देऊन एचआयव्हीची लागण केल्याचा आरोप आहे. तिच्या आजारपणामुळे पीडित मुलगी बऱ्याच दिवसांपासून तिच्या माहेरी राहत होती. आता न्यायालयाच्या आदेशावरून पती अभिषेक, मेहुणा विनायक, वहिनी प्रीती आणि सासू जयंती या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या पालकांनी केली आहे.
पीडित मुलीची मृत्यूशी झुंज
पीडित मुलीच्या आजोबांचे म्हणणे आहे की, आपल्या नातीला अतिशय वाईट वागणूक देण्यात आली आहे. मला ह्या या वेदना शब्दात मांडता येत नाहीत. पीडितेच्या वडिलांनी सरकार आणि न्यायालयाकडून कठोर कारवाई करून शिक्षा देण्याची मागणी केली आहे. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडल्याचे ती सांगते, मात्र लग्नानंतर अधिक हुंडा आणण्यासाठी छळ केला जाऊ लागला. अगदी एचआयव्ही पॉझिटिव्ह इंजेक्शनही दिले. त्यामुळे त्यांची प्रकृती सतत खालावत गेली. आज त्यांची नात जीवन आणि मृत्यूची लढाई लढत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या