मुंबई : सध्या बहुतेक लोक ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतात, त्याशिवाय डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करुन पेमेंट करतात. अनेक वेळा ग्राहक विश्वास ठेवून दुकानदार, हॉटेलचे कर्मचारी आणि वेटर यांना पेमेंट करण्यासाठी कार्ड देतात. त्यानंतर सायबर गुन्हेगारांच्या टोळी संबंधित दुकानदार किंवा कर्मचारी तुमचं कार्ड क्लोन मशीनने तुमचे कार्ड क्लोन करतात. ग्राहकांना त्याचं कार्ड क्लोन झाल्याचं समजतंही नाही आणि तुमच्या कार्डचा सर्व डेटा सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचतो. त्यानंतर सायबर गुन्हेगार तुमच्या अकाऊंटमधून पैसे लंपास करतात.


बनावट मेसेज किंवा कॉल


सध्याच्या इंटरनेटच्या युगात, अनेक वेळा सायबर गुन्हेगार तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्ससाठी मेसेजद्वारे बनावट लिंक पाठवतात. तुम्ही बनावट कॉल्स आणि मेसेजमधील लिंकवर क्लिक केल्यास सायबर गुन्हेगार तुमचा डेटा हॅक करतात. सायबर ठग कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्याकडून ऑनलाइन UPI ​​तपशील किंवा OTP मागवून तुमच्या खात्यातील पैसे गायब करतात.


बनावट व्हॉट्सॲप


सायबर गुंडांनी आता आणखी एक नवीन मार्ग शोधला आहे. बनावट पोलिस अधिकाऱ्याच्या डीपीचा वापर करून ते बनावट व्हॉट्सॲप कॉल करतात. त्यानंतर ते संबंधित व्यक्तीला सांगतात की, तुमचा मुलगा किंवा मुलगी ड्रग्ज घेतलेल्या अवस्थेत सापडली आहे. त्याची सुटका करण्यासाठी तात्काळ ऑनलाइन पेमेंट करा, नाहीतर आम्ही त्यांना तुरुंगात टाकू. त्यानंतर अनेकदा पालक घाबरतात आणि मुलांना काहीही न बोलता-विचारता पैसे पाठवतात आणि सायबर गुन्ह्याला बळी पडतात.


बनावट ऑनलाइन ॲप


अनेकवेळा सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या कंपन्यांचे कर्मचारी असल्याचे भासवून फोन करतात. त्यानंतर ते तुम्हाला बनावट लिंक किंवा क्लोन ॲप डाउनलोड करण्यास सांगतात. ग्राहक त्यांच्या जाळ्यात अडकून ॲप डाउनलोड करतात. यामुळे, सायबर गुन्हेगारांना तुमच्या फोनचा अॅक्सेस मिळतो आणि ते फोनच्या ओटीपीसह सर्व माहिती पाहू शकतात. त्यानंतर तुमचा OTP किंवा UPI माहिती वापरुन ते लगेच तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करून तुमचं खातं रिकामं करतात.


सायबर फसवणूक टाळण्याचे मार्ग



  • कुटुंबाला जागरूक करा

  • आजकाल बहुतेक घरांमध्ये सर्व लोकांकडे स्मार्टफोन आहे, त्यामुळे तुमच्या कुटुंबातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच सायबर गुन्ह्याबद्दल जागरुक करा. 

  • सायबर फसवणूक करणाऱ्यांपासून कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी त्यांना अनोळखी नंबरच्या कोणत्याही ऑफरला बळी पडू नका असे सांगा. 

  • जर कुणी तुम्हाला OTP किंवा बँक खात्याशी संबंधित माहिती विचारत असेल तर ती अशी कोणतीही माहिती देऊ नका. 

  • कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.

  • कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत तुमची माहिती शेअर करणे टाळा.

  • फसवणूक करणारे काही वेळा लहान मुलांना वेगवेगळ्या मार्गाने लक्ष्य करतात आणि त्यांना ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.