Cyber Attack on India Live Updates : भारतावर सायबर हल्ला; ठाणे पोलिसांची वेबसाईट हॅक, पाहा प्रत्येक अपडेट

Cyber Attack on India Live Updates : ठाणे (Thane Police) शहर पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. हॅकरने वेबसाइट हॅक केली आहे, त्यांनी भारत सरकारसाठी संदेश लिहिला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Jun 2022 12:22 PM

पार्श्वभूमी

Thane Police Official Website Hack : भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. मलेशियातील हॅक्टिविस्ट ग्रुप ड्रॅगन फोर्सच्या आवाहनानंतर देशभरातील अनेक वेबसाईट हॅक करण्यात आल्या आहेत. या ग्रुपनं जगभरातल्या...More

Thane Police Official Website Hack : भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक

Thane Police Official Website Hack : पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "या ग्रुपनं 'opspatuk' किंवा प्रतिहल्ला (StrikeBack) हे ऑपरेशन सुरू केलं असून, त्याचा अर्थ स्ट्राईक बॅक असा होतो. त्यामुळेच भारतातील अनेक सरकारी वेबसाईट हॅक (Website Hack) झाल्या आहेत. मुस्लिम धर्मियांची माफी मागा हाच एक संदेश सर्व वेबसाईटवर देण्यात येत आहे. यातून सरकारकडे असलेली अतिशय गुप्त आणि महत्त्वाची माहिती चोरली जाण्याची देखील शक्यता आहे."