मुंबई : नालासोपाऱ्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नालासोपाऱ्यातील प्रगती नगर येथे एका विदेशी महिलेच्या बेकायदेशीर बारवर पोलिसांनी छापा टाकला आहे. या धाडीत तुळींज पोलिसांनी 19 पुरुष आणि महिला विदेशी नागरिकांना ताब्यात घेऊन या सर्वांची कागदपत्रे तपासली. यावेळी त्यातील पाच विदेशी नागरिक अवैद्यरित्या वास्तव्य करत असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे तुळींज पोलिसांनी बार चालवणाऱ्यासह पाचही जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर येथे एक विदेशी महिला अवैध्यरित्या बार चालवत असल्याची माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती. बारमधील काही डान्स करत असल्याची क्लिप देखील पोलिसांनी मिळाली. तुळींज पोलिसांनी प्रगती नगर येथील नूर अपार्टमेंटमध्ये एका रुमवर छापा टाकत तेथे एक नायजेरिअन महिला रेस्टॉंरंटच्या नावाने बेकायदेशीर बार चालवत असल्याचं दिसून आलं. तिच्या घरात जवळपास 60 हजार रुपये किंमतीची दारु सापडली. दारु पिण्यासाठी आलेल्या 19 विदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्वांची कागदपत्रे तपासल्यानंतर त्यातील दोन पुरुष आणि तीन नायजेरिअन महिलांचे पासपोर्ट व्हिसा नसल्याचं आढळून आलं. तुळींज पोलिसांनी पाचही जणांना अटक केली असून, वसई न्यायालयाने पाचही जणांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तुळींज पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.
नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगरमधील नूर अपार्टमेंट या इमारतीमधील तीन सदनिकांमध्ये विदेशी नागरिक अनधिकृतपणे बार चालवत असल्याची माहिती तुळींजचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना दिली. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी खास पथक तयार केले आणि बारवर छापा ठाकण्याचे नियोजन केले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तुळींज पोलिसांनी महिला पोलिस कर्मचारी आणि आरसीपी प्लाटून असा मोठा पोलीस फौजफाटा घेऊन गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रगती नगर येथील बारवर छापा टाकला. पोलिसांनी छापा टाकल्यावर तीन रूममध्ये आलिशान अनधिकृत बार थाटलेल्याचे आढळून आले. पोलिसांनी यावेळी 19 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांची कसून चौकशी केली. यावेळी 19 मधील पाच नागरिकांकडे व्हिसा नसल्याचे आढळून आले. त्यामुळे बोलिसांनी बार चालकासह या पाच जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
महत्वाच्या बातम्या