Crime News : एकाने दारूच्या नशेत आपल्या वृ्द्ध सासू-सासऱ्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने पत्नी आणि मुलीवरही कुऱ्हाडीने हल्ला केला. पोलिसांनी आरोपीला जवळच्या जंगल भागातून अटक केली आहे. नागपूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमर नगरमध्ये ही घटना घडली. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


आरोपीचे नाव नरमू यादव असे आहे. आरोपी नरमू यादव याने मद्य प्राशन केले होते. दारूच्या नशेत असलेल्या नरमू यादवने आपल्याच सासू-सासऱ्यांवर कु्ऱ्हाडीने प्राणघातक वार केले. या हल्ल्यात वृद्ध सासू-सासरे यांचा मृत्यू झाला. भगवान खाडे आणि पुष्पा खाडे असे मृत सासू-सासऱ्यांचे नाव आहे. आरोपी नरमू यादवने पत्नी कल्पना यादव आणि मुलगी मुस्कान या दोघींनाही कुऱ्हाडीने हल्ला केला. या हल्यात या दोघीही गंभीर जखमी झाल्या आहेत. या दोघींचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 


मागील काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते. शनिवारी रात्री आरोपी नरमू यादव दारू सेवन करून आला होता. या दारूच्या नशेतच त्यांने पुन्हा जुने वाद उकरून काढले. त्यानंतर ही घटना घडली असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असल्यास तो जवळच्या जंगलात लपला असल्याचे समजले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: