Ratnagiri News : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील चिपळूण पोलिसांनी (Chiplun Police) 35 लाख रुपयांची गोवा बनावटीची दारु पकडली. काल रात्री 12 ते 1 च्या सुमारास शहरातील कळंबस्ते मोहल्ला रस्त्यावर पोलिसांनी गस्त घालून दारु वाहतूक करणारा एक  मोठा कंटेनर पकडला. त्यात गोवा बनावटीचे दारुने भरलेले एकूण 181 बॉक्स साफडले. पोलिसांनी पकडलेल्या कंटेनरसह आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र याचा मूळ सुत्रधार कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. तालुक्यात अनेक गावागावातून गोवा बनावटीची दारु (Goa Made Liquor) विकली जाते. या विक्रेत्यांपर्यंत दारु कोण पोहोचवतो त्याचा सध्या पोलिसांकडून शोध सुरु आहे.


तालुक्यातील अनेक गावागावातून गावठी दारु विकली जाते अशी गुप्त माहिती पोलिसांना आणि विशेष पोलिसांच्या पथकाला (Lcb) महिन्यापूर्वीमिळाली होती. या माहितीवरुन पोलिसांच्या विशेष पथकाने दिवाळीच्या आधीपासूनच गावागावात छापे मारले होते. त्यात काही जणांवर कारवाया सुद्धा करण्यात आल्या होत्या. ही कारवाई झाल्यानंतर काही ठिकाणी गावठी दारुसोबत गोवा बनावटीचीही दारु विकली जाते याची कुणकुण लागली होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार सोमवारी (31 ऑक्टोबर) मध्यरात्री 12 वाजता चिपळूणचे पोलीस अधीक्षक बारी यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या नव्या वाशिष्टी पुलाजवळ कळंबस्ते मोहल्लाच्या इथे मध्यरात्री गस्त घालून उभे होते. तितक्यात एक मोठा कंटेनर महामार्गावर आला आणि त्याची तपासणी करण्यात आली. त्या कंटेनरचा पाठीमागच्या हौदाचा दरवाचा उघडताच दारुचे बॉक्स नजरेस पडले. कंटेनरच्या दरवाजाच्या आत जाऊन पाहिले असता त्या बॉक्समध्ये गोवा बनावटीची दारु आहे हे निष्पन्न झालं. त्यानंतर त्याचा पंचनामा करुन पोलिसांनी कंटेनरसह चालकाला ताब्यात घेतले.


आज (1 नोव्हेंबर) सकाळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनरमध्ये गोवा बनावटीच्या दारुचे एकूण 181 बॉक्स होते. त्याची एकूण किंमत 35 लाख रुपये आहे. पोलिसांनी गोवा बनावटीची दारु पकडली. शिवाय कंटेनरसह आरोपीला ताब्यात घेतलं आहे. परंतु सूत्रधार कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. चिपळूण पोलिसांची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल.


अहमदनगरमध्ये गावठी दारु हातभट्टीवर कारवाई
अहमदनगरमध्ये अवैध दारु धंद्यांवर पोलिसांची कारवाई सुरु झाली आहे. अहमदनगर शहरातील एमआयडीसी भागात सुरु असलेल्या गावठी दारु हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. त्या कारवाईत अडीच लाख रुपयांची अवैध दारु नष्ट करण्यात आली असून एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नव्याने हजर झालेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यावरती जोरदार कारवाई सुरु झाली आहे.