Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात शहरातील उस्मानपुरा भागात रेखा राजू जाधव या 50 वर्षीय महिलेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेनंतर नागरिकांनी मृतदेह थेट ठाण्यात आणत रात्री 9 ते 11 वाजेपर्यंत ठिय्या मांडला. यामुळे उस्मानपुरा पोलिस ठाण्यासमोर (Osmanpura Police Station) तणाव निर्माण झाला. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा विजय राजू जाधव याच्या फिर्यादीवरून आठ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा (Chhatrapati Sambhajinagar Crime) दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement


मिळालेल्या माहितीनुसार, जाधव यांची 21वर्षांची विवाहित मुलगी 8 नोव्हेंबर रोजी घरातून निघून गेल्यापासून घरात तणावाचे वातावरण होते. बेपत्ता तरुणीच्या पतीने उस्मानपुरा ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. दरम्यान, मुलगी बुलढाण्यात असल्याची माहिती 9 नोव्हेंबर रोजी पोलिसांना मिळाली. गल्लीतील एका व्यक्तीने तिला पळून नेल्याचे समोर आले, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. परंतु रात्री उशीर झाल्याने पोलिसांनी दुसऱ्या दिवशी जाण्याचे सांगितले. याच वेळी मुलीने जागा बदलल्याने ती सापडू शकली नाही. या सर्व घटनांमुळे रेखा या तणावात असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.


Chhatrapati Sambhajinagar Crime : मुलीला शोधण्यास पोलिसांनी दिरंगाई केल्याचा नातेवाइकांचा आरोप


दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यानंतर वाढलेल्या मानसिक तणावामुळे रेखा जाधव यांनी घरातच गळफास घेतल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. पोलिसांनी माहिती मिळताच त्या ठिकाणी जाऊन मुलीसह इतर संशयितांना ताब्यात घेतले असते तर ही वेळ आली नसती, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. मृत महिलेचा मुलगा रिक्षाचालक असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, महिलेच्या आत्महत्येनंतर नातेवाइकांनी पोलिस स्टेशनसमोर मोठी गर्दी केली होती. वेळीच जर पोलिसांनी कारवाई केली असती तर हि घटना घडलीच नसती असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.


Jalgaon Crime : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने हातचलाखी, नकली अंगठीची अदलाबदली


दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करत आपल्या कडील नकली अंगठीची अदलाबदली करून असली सोन्याच्या अंगठी गायब करणाऱ्या तरुणीने जळगावसह औरंगाबाद येथे ही काही सराफा दुकानदारांना गंडविल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.


जळगाव शहरातील रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, भंगाळे गोल्डसह काही सराफा दुकानात एक सुंदर तरुणी अंगठी खरेदी करण्याच्या निमित्ताने येते. यावेळी दुकानातील अंगठ्या पाहत असताना, सोबत आणलेल्या नकली अंगठ्याची अदलाबदल करून पसार होण्यात ही महिला यशस्वी झाली. सोन्याच्या दुकानातून असली अंगठ्या लंपास करण्यात ती यशस्वी झाली असली तरी तिची संपूर्ण हातचालखी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.


या घटनेच्या बाबत जळगाव मधील शनिपेठ पोलिस ठाण्यात या अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर महिलेचा पोलीस शोध घेत आहे. सदर महिला कोणाला आढळून आल्यास या महिलेची माहिती तातडीने पोलिसांना कळवावी, असे आवाहन रतनलाल बाफना ज्वेलर्सचे व्यवस्थापक मनोहर पाटील यांनी केले आहे.


हेही वाचा