Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वाळूज एमआयडीसी परिसरातून अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबेलोहळ येथे गट नंबर 37 वर एक थरकाप उडवणारी घटना समोर आली. आज (12 जुलै) सकाळच्या सुमारास  एका 23 वर्षीय कामगार अर्जुन रतन प्रधान याचा अमानुष मारहाण करून खून (Crime News) करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.

Continues below advertisement


खासगी कंपनीत कामाला, कालच झाला होता पगार


पुढे आलेल्या माहितीनुसार, अर्जुन रतन प्रधान (रा. कमलापूर रोड, वाळूज) हा वाळूज एमआयडीसीतील एका खासगी कंपनीत कामाला होता. कालच त्याचा पगार झाला होता. आज सकाळी त्याचा सावत्र भाऊ रामकृष्ण याला अर्जुन रस्त्याच्या कडेला अर्धनग्न अवस्थेत गंभीर जखमी स्थितीत आढळून आला. ही बाब पोलिसांना कळवण्यात आली असता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अर्जुनच्या आईने मृतदेह पाहताच हंबरडा फोडला. प्राथमिक तपासात अर्जुनला कपडे काढून अमानुषपणे मारहाण केल्याचे समोर आले असून त्यातूनच त्याचा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र ही मारहाण नेमकी कुणी आणि कुठल्या करणातून करण्यात आली? याचा शोध सध्या पोलीस घेत आहे.


सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी गुन्हे दाखल करण्याच्या आदेशा विरोधात पोलिसांचे सर्वोच्च न्यायालयात अपील? 


परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी संबंधित पोलिसांवर सात दिवसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) खंडपीठाने दिले होते. याची मुदत काल (11 जुलै) मध्यरात्री संपली. मात्र या प्रकरणी गुन्हे दाखल झाले नसुन पोलिसांनी या निर्णया विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती मिळालीय. ज्यामुळे प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आम्ही आमचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवू यांना कोण पाठीशी घालतय त्याची चौकशी होणे गरजेचे असल्याची मागणी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी केली. 


स्कुटीच्या डिक्कीतून उडविली 45 हजारांची रोख; संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद


स्कुटीच्या डिक्कीत ठेवलेली 45 हजार रुपयांची रोकड चोरट्यानं चोरून नेली. ही घटना भंडाऱ्याच्या मोहाडी इथं घडली. स्कुटी चालक महिला औषधी घेण्याकरिता मेडिकलमध्ये गेली असता तिची नजर नसल्याची बाब हेरून चोरट्यानं डीक्कीतील रक्कम पडविली. ही संपूर्ण घटना मेडिकल स्टोअर्सच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. सीसीटीव्हीच्या आधारे आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.


इतर महत्वाच्या बातम्या