पुणे: पुणे तिथे काय उणे असं अनेकदा आपण ऐकतो, पुण्यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत येतात, अशातच पुण्यातील एक घटना चांगलीच चर्चेत आली आहे. मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्याने बंदुकीतून दोन राउंड फायर करत वाढदिवस साजरा केला आहे. पुण्याच्या बावधन (Pune Crime News) परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव येथे ही घटना घडली आहे. दोन राउंड फायर करत मित्रांचा वाढदिवस साजरा केला आहे. (Pune Crime News)

Continues below advertisement

कुमार खळदकर याचा वाढदिवस (Pune Crime News) साजरा होत होता, त्यावेळी त्याचा आरोपी मित्र दिनेश सिंग ज्या ठिकाणी वाढदिवस सुरू होता त्या ठिकाणी आला. त्यानंतर दिनेश सिंग याला या वाढदिवसाला फटाके नसल्याचे समजले, आरोपी दिनेश सिंगने तत्काळ आपली बंदुक काढली आणि त्यातून दोन राउंड फायर करत वाढदिवस साजरा केला. या प्रकरणी दिनेश सिंग याला बावधन पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. पुणे शहरालगत असलेल्या सुस गावातील रावीनगर येथील वृंदावन फार्म हाऊसवर खासगी पार्टी दरम्यान पिस्तुलातून हवेत गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर दिनेश बाबूलाल सिंग या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडील परवाना असलेले पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.(Pune Crime News)

घटना नेमकी काय घडली?

ही घटना 8 जुलै रोजी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृंदावन फार्म हाऊसवर केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीवरून हे प्रकरण उघडकीस आले. कुमार खळदकर यांचा वाढदिवस असल्याने काही मोजक्या लोकांसाठी खासगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. पार्टी सुरू असतानाच दिनेश सिंग याने अचानक आपल्याकडील पिस्तुल बाहेर काढले आणि उपस्थितांपुढे दोन वेळा हवेत गोळीबार केला. अंधार असूनही या गोळ्यांचे आवाज परिसरात घुमले. परंतु रात्रीचे वेळ आणि पार्टीची गोंगाट यामुळे हा गोळीबार नेमका कुठे झाला, याबाबत सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला.

Continues below advertisement