Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा शिवारात रविवारी दुपारी एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत व्यक्तीचे नाव राहुल रमेश नवथर असे असून, त्याच्या छातीवर व हातावर गंभीर जखमा दिसून आल्याने गोळ्या झाडून हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Continues below advertisement


घटनेचा उलगडा कसा झाला?


मिळालेल्या माहितीनुसार, गावातील एक शेतकरी गुरांसाठी गवत आणण्यासाठी शिवारात गेला असता त्याला एक मृतदेह पडलेला दिसला. त्याने तात्काळ गावातील पोलीस पाटील यांना याची माहिती दिली. पुढे पोलीस पाटील व ग्रामस्थांनी गंगापूर पोलिसांशी संपर्क साधताच तातडीने पथक घटनास्थळी दाखल झाले.


पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून, फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथक देखील तपासासाठी बोलावण्यात आले आहे. मृतदेहाजवळ कोणतीही शस्त्रं किंवा पुरावे मिळाले नाहीत. परंतु छातीवर व हातावर झालेल्या छिद्रांमुळे हा खून गोळ्या झाडून झाल्याची प्राथमिक शंका उपस्थित होत आहे.


मृताची ओळख व प्राथमिक तपास


मृत व्यक्तीची ओळख राहुल रमेश नवथर (रा. भिवधानोरा, गंगापूर) अशी पटली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील आणि गंगापूर पोलिसांना कळवण्यात आलं. त्यानंतर पोलिस पथक घटनास्थळी दाखल झालं. फॉरेन्सिक टीम आणि श्वानपथकालाही बोलावण्यात आलं असून पंचनामा करण्यात आला आहे.


गावात भीतीचं वातावरण


या घटनेनंतर भिवधानोरा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते. दुपारी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.


पोलीस तपास सुरू


गंगापूर पोलिसांनी घटनेची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, राहुल नवथर यांचा काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची चर्चा गावकऱ्यांत आहे. मात्र हा खून वैयक्तिक वादातून झाला की इतर कुठल्या कारणातून, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. वैयक्तिक वाद, जुना राग की इतर काही कारण याबाबत विविध चर्चा गावकऱ्यांत सुरू आहेत. गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रं वेगाने फिरवली आहेत.


हेही वाचा 


Nupur Bora: अवघ्या पाच वर्षाच्या नोकरीत 400 पटींनी संपत्ती जमवली, 93 लाख रोखं दीड कोटींचे दागिने अन् बरंच काही! उदयोन्मुख तारा ते जेलची हवा, नुपूर बोरा आहे तरी कोण?