पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली. त्याने केलेल्या तीन घरफोड्या आणि दोन जबरी चोरीच्या गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणल्या असून त्याच्या ताब्यातून तब्बल सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला. रोहित नानाभाऊ लंके (वय 21) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.


रोहित लंके हा सराईत चोरटा असून त्याच्या नावावर आतापर्यंत चोरीचे 112 गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या हद्दीतील एक क्लीनिक फोडून सत्तर हजाराचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणाचा तपास करत असताना भारती विद्यापीठ पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोहित लंके आढळून आला. त्याच्या विषयी अधिक माहिती घेतली असता तो बिबवेवाडी येथील एका घरफोडीच्या गुन्ह्यात तुरुंगात असल्याचे समजले.


त्यानंतर भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनच्या तपास पथकातील पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला या गुन्ह्यात वर्ग करून घेतले. त्याच्याकडे केलेला अधिक चौकशी त्याने साथीदारांसह ही चोरी केल्याचे कबूल केले. याशिवाय त्यांनी या मधल्या कालावधीत केलेल्या तीन घरफोड्या आणि दोन जबरी चोरीचे कुणीही पोलिसांनी उघडकीस आणले. त्याच्या ताब्यातून 100 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असा सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.