बुलढाणा: शाळेतील मुख्याध्यापिकेनेच एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. शाळेत खराब केळी दिली म्हणून त्या मुलाने पालकांकडे तक्रार केली, नंतर पालकांनी त्या मुख्याध्यापिकेला जाब विचारला. हाच राग मनात धरून त्या मुख्याध्यापिकेने आठ वर्षाच्या मुलाची पँट उतरवून अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना बुलढाण्यातील जवळा बुद्रुक (Buldhana Jawala Budruk) या ठिकाणी घडली. पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा (POSCO) दाखल करण्यात आला आहे. 


शाळेमध्ये विद्यार्थ्यांना केळी वाटप दरम्यान एका विद्यार्थ्याने खराब केळी दिल्याची तक्रार त्याच्या वडिलांकडे केली होती. त्यानंतर त्या मुलाच्या वडिलांनी याबाबत मुख्याध्यापिकेला जाब विचारला. नेमका हाच राग मनात धरून मुख्याध्यापिकेने आठ वर्षीय विद्यार्थ्यांची पॅन्ट उतरवून अश्लील चाळे केले. पालकाच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलिसांनी मुख्याध्यापिकेच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे जिल्हा परिषद शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.


माझी बदली करायला लावतो का?


शुक्रवारी शेगाव तालुक्यातील जवळा बु. येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेमध्ये 15 मार्च रोजी केळीचे वाटप करण्यात आले होते. दरम्यान शाळेतील एका विद्यार्थ्याला खराब केळी मिळाल्याने त्यांनी याबाबत त्यांच्या वडिलांना सांगितले. त्यामुळे वडिलांनी मुख्याध्यापकेला मुलाला खराब केळी का दिली? असा जाब विचारून मुख्याध्यापिकेला चांगलेच धारेवर धरले. 


याबाबत मुख्याध्यापिकेने राग मनात ठेवून शुक्रवारी पीडित विद्यार्थ्याला माझ्याबद्दल तक्रार करतो का? माझी बदली करायला लावतो का? असे म्हणत त्याची पँट काढली आणि त्या विद्यार्थ्यासोबत अश्लील चाळे केले. 


विद्यार्थी जखमी झाला


या घटनेमुळे घाबरलेला विद्यार्थी शाळेमधून पळत सुटला. दरम्यान पळताना तो शाळेच्या आवारात पडल्याने त्याच्या पायाला मार लागून तो जखमी झाला. घडलेला प्रकार पीडित  विद्यार्थ्याने त्याच्या वडिलांना सांगितला. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या वडिलांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दिली.


मुख्याध्यापिकेविरोधात गुन्हा दाखल


पालकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा जवळा बुद्रुकच्या मुख्याध्यापिकेविरुद्ध कलम 323, 506 भादवी नुसार सहकलम 8 (10) बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम सहकलम 3(1), (आर), 3(2), (व्ही ए) अ.जा. ज. अ. प्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.


ही बातमी वाचा :