Buldhana Crime: बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गाय चोरीच्या आरोपावरून अनुसूचित जातीच्या तरुणाला जात विचारत मारहाण केल्याची घटना समोर आलीय. यात एका आरोपीला अटक करण्यात आली असून इतर दोन आरोपी फरार आहेत. रोहन पैठणकर असे या पीडित तरुणाचे नाव असून, त्याच्यावर गाय चोरीचा संशय घेत काही जणांनी धर्म विचारून मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. (Crime News)

नेमकं प्रकरण काय?

खामगाव शहरातील बस स्थानक परिसरातून रात्री एका 24 वर्षीय तरुणाचं अपहरण करून सुरुवातीला त्याला जवळच असलेल्या मैदानात नेऊन त्याचा धर्म व जात विचारत जबर मारहान करण्यात आलीय. इतकंच नाही तर या तरुणाचा धर्म तपासण्यासाठी त्याला चक्क नग्न करत मैदानात असलेल्या गायींसोबत त्याचे नग्न व्हिडिओ व फोटो देखील काढण्यात आले आहे.  यानंतर पुन्हा त्या तरुणाला तीन किमी अंतरावर नेन्यात आले. तिकडेही या तरुणाला नग्न करत मारहाण करण्यात आली. या मारहाणीत या तरुणाचा एक डोळा निकामी झाला असून नाकाच हाड ही मोडल आहे. सध्या या तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. रोहन पैठणकर अस या तरुणाच नाव असून तो एका हॉटेलवर वेटर म्हणून काम करतो आणि आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवतो.

तरुणाच्या तक्रारीनंतर गंभीर गुन्ह्यांची नोंद

बुलढाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाय चोरीच्या संशयावरून मारहाण केली आहे अशी तक्रार रोहन पैठणकर या तरुणाने केली होती . या फिर्यादीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात, भारतीय न्यायसंहितेच्या गंभीर कलमांखाली तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या प्रकरणात तीन आरोपी आहेत .यात एकाला अटक करण्यात आली असून तीन दिवसांची पोलीस कोठडीही त्याला सुनावण्यात आली आहे .बाकी दोन आरोपींचा शोध चालू आहे .इतर आरोपींना लवकरात लवकर पकडून अटक करण्यात येईल .घटनेचा अधिक तपास सुरू आहे अशी माहिती बुलढाणा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली .

हेही वाचा:

ED Raids: मुंबई नाशिक, वसई-विरारसह महाराष्ट्रात 12 ठिकाणी ईडीची छापेमारी; डम्पिंग ग्राऊंडवर उभारलेला 41 अनधिकृत इमारतीच्या प्रकरणी छापा