Vijay Wadettiwar नागपूरकृषिमंत्री माणिकराव कोकाटे ( Mnister Manikrav Kokate) यांचा राजीनामा घेण्याचीमुदत मंगळवारपर्यंत म्हणजेचआज संपणार आहे. अशातच कृषिमंत्र्याच्या राजीनाम्याबाबत निर्णय न झाल्यास राज्यभर शेतकऱ्यांना सोबत घेऊन छावा संघटना राष्ट्रवादीच्या विरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील ( Vijay Ghadge) यांनी दिली आहे. दरम्यानयाचमुद्द्यावरबोटठेवतआता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीसरकारवरसडकूनटीकाकेलीआहे. कलंकित मंत्र्यांना जर त्यांच्यापदावरून काढायचं नसेल तर गोमूत्र शिंपडा, शंकराच्या पिंडीपुढे नेऊन बसवा आणि शुद्ध करून घ्या. जेणेकरूनतेशुद्धझालेअसेजनतेलासांगतायेईल. अशाशब्दात विजय वडेट्टीवार यांनी सरकारचासमाचारघेतबोचरीटीकाकेली. तेनागपूरयेथेबोलतहोते.

....तर सरकार नालायक आहे, असा शिक्का लागला जाईल- विजय वडेट्टीवार

इजा झालं, बिजा झालं आता तिसऱ्यांदा अशी वेळ आणू नका असं म्हणणाऱ्याआताकाय म्हणायचेआहे, हे मला माहित नाही. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे डागी मंत्री आहे. सरकारने निर्णय घेतला नाही, तरच सरकारची काम करण्याची पद्धत शेतकरी किंवा जनतेच्या विरोधात बेईमानीची आहे आणि हे सरकार नालायक आहे, असा शिक्का लागला जाईल. अशा कलंकित मंत्र्यांना जर त्यांना काढायचं नसेल तर गोमित्र शिंपडा, शुद्ध होतील. श्रावणमास सुरू आहे, शुद्ध गायीचं गोमित्र शिंपडायला हरकत नाही. अभिषेक करा, शंकराच्या पिंडीपुढे बसवा आणि शुद्ध करून घ्या. म्हणजे लोकांना सांगता येईल. यांना शुद्ध करून घेतलं आहे. हनीट्रॅप, शेतकऱ्यावर वक्तव्य केल्यामुळे अशुद्ध झाले होते. आता शुद्ध झालेतअसेसांगतायेईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

आम्हाला या लबाड सरकारवर विश्वास नाही- विजय वडेट्टीवार

दरम्यान, ऑपरेशन महादेव बाबत जोपर्यंत भारतीय सेना अधिकृत घोषणा करत नाही कि, पहलगामच्या आतंकी हल्लेकरी मारले. तोवर आम्हाला या लबाड सरकारवर विश्वास नाही. पहिले इतके दिवस शोधण्यासाठी कशाला लागले? देशात लपून असलेले आतमध्ये शोधण्यात वेळ का जात आहे? त्यांचा देशात घुसून मारले जाते. त्यामुळे अधिकृतपणे भारतीय सैन्य याची पुष्टी करत नाही. तोपर्यंत आम्ही विश्वास ठेवत नाही. अशीप्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनीदिली.