Buldhana Crime : बुलढाण्यामध्ये "चेक इन करंसी " च्या नावाखाली एक लाखात पाच लाख रुपयांच्या नोटा देण्याचा दावा  करणारा व्हिडीओ व्हायरल झालाय. इन्स्टाग्रामवरील shiv_tandav_99 नावाच्या अकाऊंटच्या नावावरुन एक लाखात पाच लाख रुपयांच्या नोटा देण्याचा दावा करण्यात आलाय. यासाठी मोबाईल क्रमांक देखील देण्यात आलाय. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात यामुळे खळबळ उडाली आहे. पोलीस मात्र या प्रकरणापासून अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळतंय. 


याबाबत बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला सॅम्पल नोट मिळाली आहे. हे एक मोठं रॅकेट आहे. मध्यप्रदेशातून हे चालवलं जातं. याबाबत आमच्या दोन टीम काम करत आहेत. या व्हिडीओमध्ये संबंधिताने म्हटलंय की, आम्ही महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये राहातो. मलकापूर रेल्वे स्टेशन धामणगाव येथे... चेक इन करंसी आहे, एका लाखाचे पाच लाख देतो, असं म्हणत आवाहन करण्यात येतंय. 


बुलढाण्यात " चेक इन करंसी " च्या नावाखाली एक लाखात पाच लाख रुपयांच्या नोटा देण्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल.


इंस्टाग्राम वरून  _shiv_tandav_99  नावाच्या अकाऊंट वरून एक लाख रुपयांच्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या बनावट नोटा देण्याचा दावा करण्यात आला आहे.


इंस्टाग्राम वर बनावट नोटा दाखवत करण्यात येतोय दावा


या दाव्यात संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 8788195387 हा देण्यात आला असून महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकापासून 30 किमी वर असलेल्या धामणगाव गावाचा पत्ता दावा करणारा व्यक्ती बोलत आहे.


या व्हिडिओ मुळे जिल्हाभरात खळबळ उडाली असून पोलिस मात्र या बाबतीत अनभिज्ञ असल्याचं दिसून आलं.




मोठी बातमी! एकाच वेळी तब्बल 13 बांगलादेशींना अटक, घाटकोपर पोलिसांची कारवाईhttps://t.co/yoDZnH9kC9#ghatkopar #police #bangladeshi


— ABP माझा (@abpmajhatv) January 4, 2025




इतर महत्त्वाच्या बातम्या 


Manoj Jarange: 'सरकारचे कोण-कोणते मंत्री, आमदार...',संतोष देशमुख प्रकरणावर मनोज जरांगेंचा मोठा दावा; नार्को टेस्ट करण्याची केली मागणी


Bhandara News : अंगणातून 4 वर्षीय चिमुकला बेपत्ता, साऱ्यांचा जीव टांगणीला; संपूर्ण जंगल पालथं घातलं अखेर चार दिवसांनंतर यश