Bhandara News : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येणाऱ्या चिखला माईन्स परिसरात आईसोबत मामाकडे राहणारा चार वर्षीय चिमुकला नील चौधरी हा बुधवारला नववर्षाच्या दिवशीचं अचानक गायब झाला होता. या चिमुकल्याची मागील चार दिवसांपासून वनविभाग, पोलीस प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवी संस्थासह नागरिकांच्या मदतीनं सर्वत्र शोध घेत होते. चिखला माईन्स हे घनदाट जंगलांनी वेढलेलं असल्यानं या परिसरात नेहमी हिंस्र प्राण्यांचा वावर नागरिकांनी बघितला आहे. त्यामुळे चिमुकल्या नील चौधरीचा वन्य प्राण्यांनी घात तर केला नसावा? या दृष्टीनं पोलिसांच्या मदतीनं वनविभागानंही जंगल पालथ घातलं.
माईन्सच्या प्रतिबंधित क्षेत्रात हा चिमुकला पोहचलाचं कसा?
दरम्यान, शोध मोहिमेत ड्रोन कॅमेराचाही वापर करण्यात आला. शोध सुरू असतानाचं आज दुपारी पोलीस आणि वनविभागाच्या पथकाला नील चौधरी हा चिखला माईन्सच्या प्रतिबंधित क्षेत्रातील एका झाडाखाली असलेल्या झुडपात भेदरलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, मागील चार दिवसांपासून अन्न पाण्याविना असलेल्या नीलची प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन तपासणी केली असून सध्या त्याच्यावर उपचार करण्यात येतं आहे. दरम्यान, माईन्सच्या प्रतिबंधित क्षेत्रात हा चिमुकला पोहचलाचं कसा? याचा आता भंडारा पोलीस शोध घेत आहे.
किरकोळ वाद विकोपाला, चंद्रपूर पुन्हा हादरलं!
चंद्रपूर : चंद्रपूर शहराच्या गौतम नगर भागातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चार अल्पवयीन मुलांनी एका अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुचाकीने जाताना गाडीचा कट लागून नुकसान झाल्यामुळे ही हत्या केल्याचे कारण पुढे आले आहे. कट लागल्यावर एका युवकाचा पाठलाग करत चौघांनी आधी त्याला धाक दाखवून नुकसान भरपाई मागितली. नुकसान भरपाई घेण्यासाठी गौतमनगर परिसरातून जात असतांना मात्र वाद वाढल्यानंतर चौघांनी मारहाण करत एकाची हत्या केली आहे.
जन संघर्ष अर्बन निधी बँक घोटाळा; फरार तिघे अटकेत
दिग्रस येथील जन संघर्ष अर्बन निधी बँकेमध्ये 6 हजार दोनशे ठेवीदारांची 44 कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप अध्यक्षासह सहा संचालकांवर करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान यातील फरार असलेल्या 7 जणांपैकी तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि पांढरकावडा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने नागपूर इथून अटक केली आहे. साहिल जयस्वाल, अनिल जयस्वाल आणि पुष्पा जयस्वाल असे या अटक केलेल्या तिघांची नाव आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या