मुंबई :  लोक त्यांच्या स्वप्नातील घर विकत घेण्यासाठी वर्षानुवर्षे कष्टाने कमावलेला प्रत्येक पैसा खर्च करतात. दुसरीकडे, स्वत:चे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांची फसवणूक (Fraud) होण्याचे प्रकारही घडतात. असाच एक प्रकार मुंबईत उघडकीस आला असून, त्यात एका बिल्डरने (Builder)  सुमारे 150 लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.


घर खरेदीदारांची फसवणूक 


'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणात बेंगळुरूमधील एका बिल्डरला अटक करण्यात आली आहे. या बिल्डरचा मुंबईजवळील पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये निवासी प्रकल्प होता. राजू सुलिरे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून तो मंदार हाऊसिंग नावाच्या रिअल इस्टेट कंपनीचा संचालक आहे. दोन फ्लॅटची त्याने 150 लोकांना विक्री केली होती. जवळपास 30 कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 


पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू 


आरोपीला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुख्य आरोपी सुरिलेचे साथीदार अविनाश ढोले, विपुल पाटील, अलाउद्दीन शेख आणि युसूफ खोतवाला अद्याप फरार आहेत. आरोपींनी या दोन फ्लॅटशिवाय अन्य मालमत्ता खरेदीदारांना अशाच प्रकारे फसवले आहे का, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.


या काळात फसवणूक झाली


मंदार हाऊसिंगचे विरार आणि नालासोपारा येथे बांधकामाधीन प्रकल्प आहेत. विरार पश्चिम येथील अर्नाळा पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. वर्ष 2011 ते 2018 दरम्यान घर खरेदीदारांसोबत फसवणुकीची ही प्रकरणे घडल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे 150 संभाव्य खरेदीदारांना आरोपींनी केवळ दोन-तीन फ्लॅट दाखवले. त्याने विक्रीचा करारही पूर्ण केला.


वृत्तानुसार, आरोपींनी फसवणूक झालेल्या ग्राहकांना तोच फ्लॅट दाखवला नाही तर कागदपत्रेही तयार केली. त्यांचा विश्वास जिंकण्यासाठी, प्रकल्प पूर्ण होण्यास विलंब झाल्यास आरोपींनी त्यांना व्याजही देऊ केले. विरार आणि नालासोपारा येथील निर्माणाधीन प्रकल्पांची कागदपत्रेही बनावट असल्याचा संशय आता पोलिसांना येत आहे. 


मुंबईत जुलैमध्ये 10 हजारहून अधिक घरांची विक्री; राज्याच्या तिजोरीत 830 कोटींचा महसूल जमा


जुलै महिन्यात मुंबईत 10 हजार 200 हून अधिक घरांची विक्री (House Sold) झाली असून यातून राज्य सरकारला 830 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. नव्या वर्षातील आतापर्यंतची ही उच्चांकी मालमत्ता (Property) विक्री असली तरी 2021 आणि 2022 मधील जुलैच्या तुलनेत घर विक्रीचं हे प्रमाण कमी आहे. मागील वर्षाच्या तुलनेत घरांच्या नोंदणीमध्ये 10 टक्क्यांची घट झाली आहे. मात्र, तरीही महसूल संकलन स्थिर राहिलं असल्याचे चित्र आहे.


 इतर महत्त्वाच्या बातम्या :