मुंबई : रिल्स (Rails) बनवून ते सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्याच्या फॅडमध्ये अलीकडे चांगलीच वाढ झालीय. फरंतु, हे  फॅड डोंबिवलीतील एका बांधकाम व्यासायिकाच्या चांगलच अंगलट आलंय. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संबंधित बांधकाम व्यावयायिकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्यासह इतर काही जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याची महागडी मरसडीज गाडी, कुकरी, पिस्तूल देखील जप्त करण्यात आली आहे. सुरेंद्र पाटील असं या बांधकाम व्यवसायिकाचं नाव आहे.   


प्रसिद्धी मिळवण्यसाठी वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. परंतु, हे रिल्स कोठे बनवायचे याचे अनेकांना भान राहत नाही. सुरेंद्र पाटील यांचं देखील असंच झालं. चक्क पोलिसांच्या खुर्चीवर बसून रिल्स बनवल्यामुळे पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत.  


काही कामानिमित्त मानपाडा पोलिस ठाण्यात गेलेल्या बांधकाम व्यवसायीक पाटील याने पोलिसांच्या खुर्चीवर बसूनच रील्स बनवले आहे. शिवाय बंदूक घेऊन मित्रांसोबत डान्स करतानाचा व्हिडीओ पाटील यांने बनवला. त्यानंतर त्याने तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केलाय. या प्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकाला सांगपाडा पोलिसांनी अटक अधिक चौकशी सुरू केली आहे. 


डोंबिवली ठाकुर्ली परिसरात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक  सुरेंद्र पाटील यांना एका तांत्रिक बाबाने पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवत तब्बल 30 लाखाना गंडा घातला होता. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत कथित तांत्रिक बाबासह साथीदारांना अटक करत 20 लाख रुपये रक्कम हस्तगत केली होती. ही रक्कम परत करण्यासाठी मानपाडा पोलिसांनी फिर्यादी सुरेंद्र पाटील याला पोलिस ठाण्यात बोलवले होते. सुरेंद्र हा दिवाळीत मानपाडा पोलिस ठाण्यात गेला होता. संबधित पोलिस अधिकारी सुरेंद्र याला केबिनमध्ये थांबवून वरिष्ठांची सही घेण्यासाठी ते बाहेर गेले. याचा फायदा घेत पाटील याने खुर्चीवर बसून स्वतः चे रिल बनविले. त्यानंतर त्याने हातात बंदूक घेऊन मित्रांसोबत डान्स करतानाचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल केला.