Sangli Crime News: सांगली : सांगलीत (Sangli News) किरकोळ वादातून एका विद्यार्थ्यांनं केलेल्या कृत्यामुळे संपूर्ण शहर पुरतं हादरुन गेलं आहे. हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांमध्ये क्षुल्लक कारणातून वाद झाला आणि वादाचं रुपांतर एका भीषण घटनेत झालं. किरोकळ वादातून संतापलेल्या एका विद्यार्थ्यानं आपल्यात वर्गमित्रावर कोयत्यानं सपासप वार केले. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगलीमधील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये ही घटना घडल्यचं समोर आलं आहे. 


सांगलीत एका हायस्कुलमधील विद्यार्थ्यानं वर्गातीलच विद्यार्थ्यावर किरकोळ वादातून कोयत्यानं वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सांगलीमधील हरभट रस्त्यावरील आरवाडे हायस्कूलमध्ये ही घटना घडल्यचं समोर आलं आहे. सलमान जावेद मुल्ला असं हल्ला झालेल्या विद्यार्थ्यांचं नाव आहे. जखमी विद्यार्थी इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. त्याच्याच वर्गातील एका विद्यार्थ्यांनं त्याच्यावर कोयत्यानं सपासप वार केले आहेत. शाळा सुटल्यावर दोघांमध्ये वाद झाला आणि वादाचं रुपांतर भीषण घटनेत झालं. शाळा सुटल्यावर कोयत्यानं आपल्या वर्गमित्राच्या मानेवर हल्ला केला. हल्ल्यानंतर संशयित विद्यार्थी पसार झाला. या प्रकारानं शाळेत खळबळ उडाली. 


नेमकं घडलं काय? 


गेले काही दिवस दोघांमध्ये वाद सुरू होता. दरम्यान, जखमी विद्यार्थी सलमान याच्यावर विश्रामबाग येथील खासगी रुग्णालयात तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर 35 टाके घालण्यात आले. रात्री उशिरा या हल्ल्याची सांगली शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता नववीमध्ये शिकणारा सलमान आणि संशयित अल्पवयीन मुलगा या दोघांत काही दिवसांपासून किरकोळ कारणातून वाद सुरू होता. एकमेकाला चिडवाचिडवी सुरू होती. दोन दिवसांपूर्वीही त्यांच्यात वाद झाला होता. दोघांमधील वाद धुमसत असतानाच संशयितानं सोमवारी दप्तरातून कोयता आणला होता. 


संध्याकाळच्या सुमारास त्यानं बाकावर बसलेल्या सलमानवर कोयत्यानं सपासप वार केले, मानेवरही त्यानं थेट वार केला. यावेळी वार अडवताना सलमानच्या हातावरही जखम झाली. भर शाळेत हल्ला झाल्यानंतर मुलांमध्ये घबराट निर्माण झाली. मुलांचा आरडाओरड सुरू झाला. जखमी सलमानला शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांनी उचलून सिव्हिलमध्ये उपचारास नेले. तिथून विश्रामबागच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली. मानेवरील जखमेवर 35 टाके घालण्यात आले. उपचारानंतर सलमानची प्रकृती थोडीसी स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. सलमानवर हल्ला केल्यानंतर संशयित हल्लेखोर मुलगा पसार झाला आहे.