Beed News : बीडमधील मंडळ अधिकारी सचिन सानप (Sachin Sanap) यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. अवैधरित्या केलेले उत्खनन कमी दाखवण्यासाठी मंडळ अधिकारी सचिन सानप यांनी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती दीड लाख रुपयांची लाज स्वीकारण्याचं मान्य झालं होतं. यातील पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये स्वीकारताना आज लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
लुचपत विभागाच्या या कारवाईनंतर महसूल क्षेत्रात मोठी खळबळ
बीड शहरातील तहसील कार्यालयाजवळील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, लाच लुचपत विभागाच्या या कारवाईनंतर महसूल क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
धुळ्यात शिक्षिकेकडून 2 लाखांची लाच घेताना बड्या महिला अधिकाऱ्याला अटक; शिक्षण क्षेत्रात खळबळ, नेमकं प्रकरण काय?