ठाणे : भिवंडी तालुक्यातील अंबाडी वाशिंद रस्त्यावर मैंदे गावाच्या हद्दीत शुक्रवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास गोळीबाराची घटना (Bhiwandi Crime) घडली. दुचाकीवरून जात असलेल्या दोघा जणांवर त्यांचा पाठलाग करणाऱ्या दुचाकीवरील अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या गोळीबारात दोघे जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर सायन मुंबई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पडघा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिरोज रफिक शेख (वय 27), अजीम अस्लम सय्यद (वय 30) दोघे रा. चंदनसार, विरार पूर्व अशी जखमींचे नाव आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींचा पाठलाग करणारे दोघेजण त्यांच्या पाळतीवर होते. घटनास्थळावर आरोपी हे लाल रंगाच्या सीबीझेड दुचाकीवरून तोंडावर मास्क लावून आले होते. त्यांनी केलेल्या सहा राऊंड फायर पैकी तीन गोळ्या या दोघांना लागल्या आहेत. हा गोळीबार नेमका कोणी आणि कोणत्या कारणावरून केला आहे यांची अजून माहिती स्पष्ट होत नाही. पोलीस विभागाकडूनही याबाबत गोपनीयता बाळगली जात आहे. या प्रकरणी पडघा पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरा विरोधात गुन्हा दाखल केला करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार
आझाद मैदान पोलिस ठाण्यात एका सहाय्यक पोलीस निरीक्षकावर महिलेने बलात्काराचा (Mumbai Crime News) गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षकाने बलात्कार करत असल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. ऑक्टोबर 2020 साली सहाय्यक पोलीस निरीक्षकाने शिवाजी पार्क परिसरात बलात्कार केल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. तपासादरम्यान अत्याचार व ब्लॅकमेलिंग करत असल्याचे समोर आले आहे
राज्य दहशतवादविरोधी विभागातील (एटीएस) एपीआय विश्वास पाटील विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तपासादरम्यान मदत करणाऱ्या महिलेशी ओळख वाढवून पाटीलने तिला थंड पेयातून गुंगीचे औषध देत बलात्कार केल्याचे पिडीतीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पुढे याचे रेकॉर्डिंग करून व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी ब्लॅकमेल करून अत्याचार सुरू होते. अखेर, पाटीलचे अत्याचार वाढल्याने महिलेने पोलिसांत धाव घेत अत्याचाराला वाचा फोडली. या प्रकरणात आझाद मैदान पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास करत आहेत.
ही बातमी वाचा :