Case Filed Against Bhaskar Jadhav : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबद्दल अवमानास्पद आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्यावर कुडाळ पोलीस ठाण्यात (Kudal Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भास्कर जाधवांवर गुन्हा दाखल व्हावा, अशी तक्रार भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. कुडाळमधील सभेत राणेंवर अत्यंत खालच्या दर्जाची शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. काल आमदार वैभव नाईक यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं केलेल्या कारवाईविरोधात शिवसेनेनं मोर्चा काढला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना भास्कर जाधवांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं होतं. याचप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात चितावणीखोर भाषण केल्या प्रखरणी आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात कुडाळ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. 153, 505 (1) (क), 500, 504 कलमांतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काय म्हणाले होते भास्कर जाधव? 


भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे होमग्राउंड समजल्या जाणाऱ्या सिंधुदूर्ग जिल्ह्यात राणेंवर घणाघाती टीका केली. नारायण राणे हे देशाचे नेते असल्याचं सांगतात पण गल्लीत त्यांना कुत्रंदेखील विचारत नाही. भास्कर जाधव यांनी मध्यम, लघु, सुक्ष्म खातं म्हणत नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे या तिघांवर टीका केली. शिवसेनेने काही केले नाही, असं नारायण राणे म्हणतात. मग तू काय म्हशी भदरात होता? अशा शब्दात जाधव यांनी टीकास्त्र सोडलं. नारायण राणे केंद्रात मंत्री आहेत. मात्र, त्यांच्यामुळे देशात कोकणाची लाज जात असल्याचं सांगितलं. राणेंना तामिळनाडूचा प्रश्न विचारला की, केरळचे उत्तर देतात. कोकणातून देशाला विद्वान, विचारवंत नेते मिळाले. मात्र, राणेंनी देशात कोकणाची लाज काढली असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी भास्कर जाधव यांनी राणेंची मिमिक्री करत टीकास्त्र सोडलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Bhasakar Jadhav On Narayan Rane: 'शिवसेनेने काही केले नाही, मग तू....', भास्कर जाधव यांची नारायण राणेंवर बोचरी टीका