Beed Crime: बीडच्या गेवराई तालुक्यातील गंगावाडी येथे प्रेम संबंधातून मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल पाऊण तास नातेवाईकांनी तलवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठेवण्यात आला. यातील आरोपींना अटक करा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणात मुलीच्या वडिलांना भावाला आणि चुलत्याला अटक करण्यात आली आहे. मात्र, इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. (Beed Crime)

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गंगावाडी गावात प्रेमसंबंधामुळे झालेल्या मारहाणीत 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकारानंतर संतप्त नातेवाईकांनी तरुणाचा मृतदेह पोलीस ठाण्याबाहेर ठेवत जोरदार आंदोलन केलं. तब्बल पाऊण तास मृतदेह तलवाडा पोलीस ठाण्याबाहेर ठेवण्यात आला होता. यावेळी नातेवाईकांनी "आरोपींना अटक करा, न्याय द्या" अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रकरणात मुलीच्या वडिलांना भावाला आणि चुलत्याला अटक करण्यात आली आहे. मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

Continues below advertisement

प्रेमसंबंधातून मारहाण, तरुणाचा मृतदेह घेऊन नातेवाईक पोलीस ठाण्यात

मृत तरुणाचे नाव शिवम काशिनाथ चिकणे (वय 21) असून त्याचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. याच कारणावरून मुलीच्या कुटुंबीयांनी शिवमला जबर मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील, भाऊ आणि चुलत्याला अटक केली आहे. मात्र इतर दोन आरोपी अद्याप फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून सातत्याने केली जात होती. या आरोपींना लवकरच अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी तरुणाचा अंत्यविधी केला आहे. शिवम काशिनाथ चिकणे या 21 वर्षीय तरुणाचे गावातीलच एका मुली सोबत प्रेम संबंध होते यातून मुलीच्या कुटुंबीयांनी मारहाण केली आणि उपचारादरम्यान शिवम चा दुर्दैवी मृत्यू झाला. अखेर 24 तासानंतर शिवम वर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या घटनेमुळे गंगावाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे, प्रेमसंबंधामुळे एका तरुणाचा जीव जाणं हे अत्यंत दुर्दैवी असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.

हेही वाचा

Pune Crime News: तरुणीला एकांतात मिठी मारण्याचा प्रयत्न; विनयभंग करणार्‍या ज्योतिषाला अटक, पुण्यातील घटनेनं संताप