Beed Crime News: बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर महादेव गित्ते याच्या पत्नीकडून तुरुंग प्रशासनावर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड (Walmik Karad) याला व्हिआयपी ट्रिटमेंट मिळत असून तो पोलिसांना आदेश देतो. त्याच्या सांगण्यावरुनच महादेव गित्ते (Mahadev Gitte) यांना मारहाण करण्यात आली, असे मीरा गित्ते यांनी म्हटले होते. एवढेच नव्हे तर मीरा गित्ते यांनी मरवळवाडीचे सरपंच बापू आंधळे (Bapu Andhale Murder) यांच्या हत्येविषयी एक सनसनाटी दावा केला आहे. बापू आंधळे यांची हत्या वाल्मिक कराडच्या सांगण्यावरुन झाली, असा आरोप मीरा गित्ते यांनी केला.

सरपंच बापू आंधळे यांची हत्या झाली त्यादिवशी आमच्या घरावर अचानक गोळीबार सुरु झाला. या हल्ल्यावेळी माझ्या पतीला गोळी लागल्याने ते खाली बसले. तेव्हाच बापू आंधळे यांची गोळ्या घालून हत्या झाली तेव्हा मारेकरी म्हणाला की, अण्णाने दिलेलं काम झालं, चला आता'. त्यानंतर सगळे मारेकरी फरार झाले, असा दावा मीरा गित्ते यांनी केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराड आणि महादेव गित्ते यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर महादेव गित्ते आणि अक्षय आठवले गँगला अन्य तुरुंगांमध्ये हलवण्यात आले होते. सुरुवातीला महादेव गित्ते याने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला चोपल्याची माहिती समोर आली होती. परंतु, महादेव गित्ते याने, वाल्मिक कराड याच्या सांगण्यावरुन तुरुंगातील पोलिसांनी मलाच मारहाण केली, असे म्हटले होते.  याप्रकरणात तुरुंगातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी व्हावी, अशी महादेव गित्ते याच्या पत्नीने केली होती. मीरा गित्तेनेही याबाबत पोलिस अधीक्षकांची भेट घेत सुदर्शन घुलेने धमकी दिल्याचा दावा केला आहे. 

'तुम्ही आतमध्ये आहात म्हणून वाचलात, नाहीतर बेक्कार पद्धतीने मारलं असतं'

महादेव गित्ते याच्या पत्नीकडून वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर सातत्याने गंभीर आरोप केले जात आहेत. सुदर्शन घुले याने आपल्या पतीला तुरुंगात धमकावल्याचा दावा मीरा गित्ते यांनी केला. 'आज तुम्ही आतमध्ये आहेत म्हणून वाचला आहात. बाहेर असला असता तर तुम्हाला संतोष देशमुख यांच्यापेक्षा आणखी बेकार पद्धतीने मारलं असतं', अशी धमकी सुदर्शन घुले याने महादेव गित्ते यांना दिल्याचे मीरा गित्ते यांनी म्हटले.

आणखी वाचा

कराड गँगचा माज अजूनही उतरेना! संतोष देशमुखपेक्षा वाईट हाल केले असते, सुदर्शन घुलेने महादेव गित्तेला तुरुंगातच धमकी, पत्नीचा दावा