Beed Crime: बीडच्या परळी मध्ये पोरानेच आपल्या जन्मदात्या आईची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. परळी तालुक्यातील भोजनकवाडी येथे राहते घर नावावर करायला नकार दिल्याने मुलानेच आपल्या आईची डोक्यात दगड घालून हत्या केल्याची घटना घडली आहे.सुनंदा ज्ञानोबा कांगणे असे मृत आईचे नाव असून आरोपी असलेल्या चंद्रकांत कांगणे याला परळी ग्रामीण पोलिसांनी अटक केले आहे.

Continues below advertisement

नेमकं घडलं काय? 

परळी तालुक्यातील भोजनाकवाडीत पोटच्या मुलानेच राहत्या घरासाठी आईचा जीव घेतल्याची घटना घडली आहे.गेल्या काही दिवसापासून आरोपी चंद्रकांत ज्ञानोबा कांगणे हा त्याच्या आईच्या नावावर असलेले घर त्याच्या नावे करण्यासाठी मागे लागलेला होता मात्र आईने नकार दिल्याने मुलाने कुरुंदाचा दगड डोक्यात घालत आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली.या प्रकरणी आरोपी चंद्रकांत कांगणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत. 

सविस्तर माहिती अशी की, सुनंदा कांगणे यांच्या नावावर गावात राहते घर होते. त्यांचा मुलगा चंद्रकांत कांगणे याने हे घर आपल्या नावावर करून देण्याचा वारंवार दबाव आणला होता. मात्र, सुनंदा यांनी घर मुलाच्या नावावर करण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या चंद्रकांतने आईशी वारंवार वाद घालण्यास सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून हा वाद अधिकच तीव्र झाला . अखेर शनिवारी संध्याकाळी संतापाच्या भरात चंद्रकांतने घरात असलेला कुरुंदाचा दगड उचलून थेट आपल्या आईच्या डोक्यात घातला. अचानक झालेल्या या हल्ल्यात सुनंदा कांगणे गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.

Continues below advertisement

या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक चौकशीत मुलानेच घराच्या वादातून आईवर हल्ला केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आरोपी चंद्रकांत कांगणे याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

हेही वाचा:

उत्तर प्रदेश ATS पथक मुंबईत, भिवंडीतून तिघांना अटक; दहशतवादी कारवायांतील सहभागाचा तपास