Beed Crime news: वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येसाठी कारणीभूत असणाऱ्या मुळशीतील हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक असणारे पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्याबाबत आता एकापाठोपाठ एक धक्कादायक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh Murder) यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) याला बीड जिल्ह्यातील कारागृहात ठेवण्यात जालिंदर सुपेकर यांनी महत्त्वाची भूमिका होती, अशी माहिती माझ्यापर्यंत आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे. त्या बुधवारी 'एबीपी माझा'शी बोलत होत्या.
जालिंदर सुपेकर यांच्याकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी केली जाते. सुरेश धस यांनी सुद्धा आता सुपेकर यांनी 300 कोटींची मागणी होती असा आरोप केला आहे. यामुळे यावर आता अनेक खुलासे होतील. गन लायसन्स प्रकरणातही सुपेकर यांनी पैशाची मागणी केली होती. सुपेकर आणि पुण्याचे तत्कालीन आयुक्त अमिताभ गुप्ता या दोघांनी शस्त्र परवान्यांचे वाटप करण्यात प्रचंड प्रमाणात पैसे खाले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही याची चौकशी लावली आहे. 600 प्रकरणे अशी आहेत ज्यात पैसे खाल्ले गेले आहेत. यापैकी 300 प्रकरणाचा अहवाल गृह विभागासमोर आला आहे. त्याची माहिती घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. अनेक प्रकरणे बाकी आहेत. यातून आता अनेक खुलासे होतील, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
Walmik karad: वाल्मिक कराडला मकोका केसमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न, तो भाजपमध्ये प्रवेश करु शकतो: अंजली दमानिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 28 डिसेंबरला आदेश दिले होते की, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करा. वाल्मिक कराड याची संपत्ती अजून जप्त केली नाही. सध्या पाठीशी घालण्याचे प्रकार समोर येत आहेत. देशमुख प्रकरणात अजूनही कृष्णा आंधळे याला अटक नाही. त्यांचे मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले नाहीत. वाल्मीक कराडला मोक्कामधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उद्या जाऊन ते भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
Anjali Damania: अंजली दमानिया एसीबीच्या कार्यालयात जाणार
लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे मी पत्र दिलं होतं. त्यांनी मला बोलवलं आहे. मी कृषी विभागाच्या अनुषंगाने काही आरोप केले होते. दुप्पटपेक्षा जास्त किमतीने औषधाच्या लाखो बॉटल खरेदी करण्यात आल्या आहेत. ज्यांच्याकडून औषध घेण्यात आली होती. त्यांचे खाते क्रमांक देणार आहे. एसीबीकडून मला काही अपेक्षित नाही. कारण यापूर्वी देखील मी तक्रार केली होती. परंतु काहीच झालं नाही केवळ राजकारणासाठी वापर झाला. 350 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा हा विषय आहे. मी लोकायुक्त यांच्याकडे तक्रार केली होती. 16 जूनला याची सुनावणी आहे. मुख्य सचिव यांनादेखील बोलवलं आहे. मी डीजी मुख्यमंत्री याना डिटेल्स पाठवले आहेत. सरकारला गांभीर्याने हा विषय घ्यायचा नसेल तर मी कोर्टात जाणार आहे. मी परळीमधे राहिले मला महाजनकोकडून माहिती घेतली आहे. बॉटम ऐश हे विकू देत नव्हते ते परस्पर विकत होते. मला महाजनकोने अनेक तक्रारी दिल्या. मी कलेकटर विरोधात असंख्य तक्रारी दिल्या होत्या. १३ वर्ष ते तिथे होते. ६०० पोलीस अधिकारी बदलले, असे अंजली दमानिया यांनी सांगितले.
आणखी वाचा
जालिंदर सुपेकरांबाबत सुरेश धसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, तुरुंगात 300 कोटी मागितले