Beed Crime News : बीडच्या केजमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून एका अल्पवयीन मुलीला एका तरुणाने कॉफी शॉपमध्ये नेवून तिच्यावर अत्याचार (Crime News) केल्याची घटना घडलीय. या तरुणाने 20 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री एका चौदा वर्षीय मुलीचे अपहरण (Beed Crime News) केले होते. यानंतर शहरातील एका कॉफी शॉपमध्ये घेवून जात तिच्यावर अत्याचार केले.
Beed Crime News : घटनेनंतर आरोपी फरार, शहरातील कॉफी शॉपवर कारवाईचे सत्र
दरम्यान, हा प्रकार कुटूंबीयांना समाजताच त्यांनी तातडीने केज पोलीस ठाण्यात धाव घेते घडलेला प्रकार सांगितला. तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तसेच या प्रकरणाचा आधी तपास केज पोलीस करत आहे. मात्र या घटनेनंतर पोलिसांनी केज शहरातील कॉफी शॉपवर कारवाईचे सत्र सुरु केले आहे.
Beed Crime : राष्ट्रीय महामार्गातील मावेजा गैरव्यवहार प्रकरण; शासकीय सेवेतील दोघे निलंबित, तिघांची सेवा समाप्त
बीड मधील मावेजा गैरव्यवहार प्रकरणात शासकीय सेवेतील दोघांना निलंबित करण्यात आलंय. धुळे-सोलापूर महामार्ग भूसंपादन प्रकरणात वाढीव मावेजा लाटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची बनावट सही करून तब्बल 241 कोटींचा वाढीव मावेजा मंजूर करून घेण्यात आला. त्यातील 73 कोटी रुपयांचा मावेजा मिळवून शेतकऱ्यांना वाटप केल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सहाय्यक महसूल अधिकारी संजय हंगे आणि सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील यांना निलंबित केले. तर कंत्राटी कर्मचारी अविनाश चव्हाण, अजहर शेख आणि त्र्यंबक पिंगळे या तिघांची सेवा समाप्त केली.
दरम्यान, या प्रकरणात पाच वकिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला असून पाचही वकील फरार आहेत. 73 कोटी रुपयांच्या या घोटाळ्यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत केला जातो आहे.
बापाने स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण करून केले गर्भवती; गोंदियाच्या डुग्गीपार सडक अर्जुनी तालुक्यातील घटना
गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यात डुग्गीपार पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका बापाने स्वतःच्या 14 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण करून गर्भवती केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डुग्गीपार पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बापावर लैंगिक बाल शोषण प्रतिबंधक कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो पोलीस कोठडीत आहे. आरोपीची पत्नी अंदाजे 10 वर्षांपासून माहेरी राहत असून आरोपीसोबत घरात मुलगी, मुलगा आणि त्याची (आरोपीची) आई राहत होते. मुलगी लहान असल्याने बापासोबतच झोपत होती आणि याच निरागस विश्वासाचा फायदा घेत आरोपी बापाने विकृतपणे तिच्यावर अत्याचार केला. काही महिन्यांपासून पोटात अस्वस्थता जाणवल्यानंतर मुलीला गोंदियातील महिला रुग्णालयात नेण्यात आले. तपासणीदरम्यान मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. यानंतर पोलिसांत तात्काळ गुन्हा नोंदवण्यात आला अजून आरोपी बापाला पोलिसांनी अटक केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या