बीड : चोरी करताना हाती नकली नोटा लागल्या. पण त्या खऱ्या असल्याचं वाटल्याने चोरांनी चक्क दुकानातच डान्स केल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना बीडच्या अंबाजोगाई शहरातील वाघाळा रोड परिसरात घडली आहे. या घटनेत चोरांनी गल्ल्यातील सहा रुपये आणि दुकानासमोर असलेली मालकाच्या नातेवाईकाची दुचाकी पळवली. 


अंबाजोगाई शहरातील वाघाळा रोडवरील वरद पार्कमधील सहशिक्षक सूर्यकांत जानसराव तेलंग यांच्या दुकानाचे शटर तोडून चोरांनी दुकानात प्रवेश केला. परंतु चोरीच्या वेळी दुकानात त्यांना लहान मुलांच्या खेळण्यातील दोनशे, पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा हाती लागल्या. त्यांना या नोटा खऱ्या असल्याचे वाटल्याने चोरांनी चक्क डान्स केल्याचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


अंबाजोगाई शहरातील वाघाळा रोडवरील वरद पार्कमध्ये सहशिक्षक सूर्यकांत तेलंग यांचे दुकान आहे. शनिवारी (23 एप्रिल) त्यांच्या दुकानात चोर शिरले. दुकानात आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी करताना दोन चोर दिसून आले. दुकानाचे शटर तोडून चोरांनी दुकानात प्रवेश केल्यानंतर गल्ल्यातील पैसे लंपास केले.


त्यानंतर त्यांना दोनशे, पाचशे आणि दोन हजारांच्या नोटा हाती लागल्या. परंतु, या नोटा लहान मुलांच्या खेळण्यातील होत्या. परंतु, या नोटा खऱ्या असल्याच वाटल्याने चोरांनी चक्क डान्स केला. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी सूर्यकांत तेलंग यांनी अंबाजोगाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दुकानाच्या ड्रॉवरमध्ये चोरांना सहा हजार रुपये मिळाले. चोरांनी जाताना दुकानासमोरील तेलंग यांच्या नातेवाईकाची दुचाकीही लांबवली.


अंबाजोगाई पोलीस स्टेशनमध्ये या चोरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून ते पसार झाले आहेत. अंबाजोगाई पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


इतर बातम्या


Beed Crime : बेपत्ता असलेला आडत व्यापारी हातपाय बांधलेल्या गंभीर जखमी आणि बेशुद्धावस्थेत आढळला!