Kalyan Crime News : कल्याणमधील वसंत व्हॅली (Vasant Valley) परिसरातील डीमार्टमध्ये (DMart) एका परप्रांतीय महिलेने मराठी कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत त्या महिलेला जाब विचारला. ‘मला पोलिसांची आवश्यकता आहे का?’, असा प्रश्न विचारत तिने सुरुवातीला प्रतिसाद दिला. मनसेच्या हस्तक्षेपानंतर या महिलेने अखेर माफी मागितली. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा भाषेच्या (Marathi Language) मुद्द्यावरून स्थानिक राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Kalyan News : परप्रांतीय महिलेचा हात आपटून थयथयाट, म्हणाली...
अशीचएकघटनायापूर्वीदेखील कल्याणच्या पटेल मार्टमध्येघडलीहोती. यात दुकानात मराठी बोलण्यावरून वाद उफाळून आला होता. यात सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर याठिकाणी खरेदी करण्यासाठी गेले होते, यादरम्यान दुकानातील एका महिला कर्मचारीसोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून वाद झाला. घाणेकर यांनी सांगितले तू मराठी का नाही बोलत नाही, यांवर महिला कर्मचारी संतापत जोराने टेबलवर हात आपटले. मराठी बोलण्याची सक्ती आहे का? मी मराठी नाही बोलणार. कर्मचारी महिला असल्याने घाणेकर यांनी पटेल मार्टच्या मॅनेजरला ही घटना सांगितली. याच दरम्यान मनसेचे कार्यकर्ता देखील दुकानात पोहोचले.
दरम्यान, मॅनेजर मनीषा धस यांनी दिलगिरी व्यक्त केली. घाणेकर यांनी पटेल मार्टला इशारा दिला आहे, 15 ऑक्टोबरपर्यंत मार्ट मधील सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आली पाहिजे. असे नाही झाले तर मी दुकानाबाहेर उभं राहून येथून खरेदी करू नका, असे आवाहन लोकांना करणार असल्याचे सांगितले. मार्टमधील सर्व कर्मचारी मराठीत बोलणार, असं मॅनेजर मनीषा धस यांनी आश्वासन दिल्याने हा वाद तूर्तास निवळला होता.
भिवंडीत उडान पुलावर कार व रिक्षामध्ये भीषण अपघात; रिक्षातील दोघेजण जखमी
भिवंडी शहरातील राजीव गांधी उडान पुलावर बागेफिरदौस जवळ पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. इनोवा कार आणि रिक्षा यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली असून, रिक्षातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धडकेनंतर मागून येणाऱ्या एका दुचाकीने देखील दोन्ही वाहनांना धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. अपघात एवढा भीषण होता की इनोवा कार आणि रिक्षा दोन्हींचे चेंदामेंदा झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, या अपघाताचा तपास सुरू आहे. दरम्यान, जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
