Badlapur School Girl Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात (Badlapur torture case) एसआयटीचा (SIT) तपास पूर्ण झाला आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीने वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांसमोर गुन्ह्यातील सहभाग मान्य केला आहे. याबाबतची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 


बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैगिक अत्याचार 


विशेष तपास पथकाने (एसआयटी) बदलापूरच्या एका शाळेतील दोन बालिकांवरील लैगिक अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे. कल्याण येथील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. शाळेचे कर्मचारी, डॉक्टर, फॉरेन्सिक अधिकारी आणि तहसील अधिकारी यांच्यासह 20 पेक्षा अधिक व्यक्तींच्या साक्षीचा सहभाग असून आरोपीने एका मुलीला मारहाण केल्याचे तिने सांगितले होते. याप्रकरणी सोमवारी प्रथम आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्या प्रकरणात गुरुवारी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचे विशेष तपास पथकाच्या प्रमुख महानिरीक्षक आरती सिंह यांनी सांगितले. 


विविध कलमान्वये गुन्हे दाखल


याप्रकरणी विशेष तपास पथकाने भारतीय न्याय संहिता कलम 65 (2) (12 वर्षांखालील मुलीवर बलात्कार), 74 (महिलेवर अत्याचार करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे), 75 (लैंगिक छळ करणे), 76 (महिलांविरोधात जबरदस्ती), तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा कलम 4 (2), 8 व 10 अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. प्रत्येकी 500 पानांच्या या आरोपपत्रात प्रत्येकी 20 पेक्षा जास्त साक्षीदार, वैज्ञानिक पुरावे यांचा समावेश आहे. कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकाने 12 आणि 13 ऑगस्ट रोजी शाळेच्या स्वच्छतागृहात बालिकांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.


गुन्ह्यात सहभागी असल्याचे आरोपीनं पोलीस चौकशीत केलं मान्य


प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा आरोपीने या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पोलीस चौकशीत, तसेच डॉक्टरांसमोरही मान्य केले होते. डॉक्टरांसमोर आरोपीने दिलेली माहिती या प्रकरणातील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो, असे अधिकान्याने सांगितले. भारतीय न्याय संहिता व पोक्सो कायद्यातील 183 तरतुदीनुसार दोन्ही यालिकांचा जयाब नोंदवण्यात आला आहे. याशिवाय ओळखपरेडमध्येही आरोपीला पीडित मुलींनी ओळखले आहे.


महत्वाच्या बातम्या:


Highcourt : आरोपी अद्याप फरार का?; बदलापूर घटनेवरुन हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे, मीरा बोरवणकरांचा उल्लेख