मुंबई : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या बाबा    सिद्दीकींच्या हत्येचे नवनवे कंगोरे आणि नवनवे  अँगल समोर येत आहेत.  बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे तर  एकजण फरार झाला आहे. एकीकडे  पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असताना, दुसरीकडे या हत्येचं नवं कनेक्शन समोर आलंय. दोन एसआरए प्रकल्पाला विरोध केल्यामुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.मुंबई पोलिसांनुसार लॉरेन्स बिश्नोईच्या थेट सहभागाची शक्यता कमी असल्याचं समजंतय.संत ज्ञानेश्वर नगर, भारत नगर झोपडपट्टीच्या एसआरए प्रकल्पाला त्यांनी विरोध त्यांच्या जीवावर बेतल्याचं बोललं जातयं. दरम्यान सिद्धिकींचे मारेकरी बिश्नोई टोळीचे असून मात्र लॉरेन्सचा थेट संबंध नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे 


सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi Gang) असल्याचा दावा एका फेसबुक पोस्टमधून (Facebook Post) करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे.मात्र  मुंबई पोलिसांनुसार  लॉरेन्स बिश्नोईचा बाबा सिद्दिकीच्या हत्येशी काहीही संबंध नाही. गोळीबार करणारे हे लॉरेन्सच्या टोळीत असण्याची शक्यता आहे. मात्र  या हत्येमागे लॉरेन्सचा हात असण्याची शक्यता फारच कमी आहे. लॉरेन्सची मोडस ऑपरेंडी अशी नसल्याने पोलिस हा विचार करत आहेत. लॉरेन्स त्याच्या गुन्ह्याची जबाबदारी घेतो. येथे अद्याप असे काहीही घडलेले नाही. आता मुंबई पोलीस तपासाच्या दिशेने पुढे जात आहेत. 


बिल्डरकडून प्रकल्पाविषयी कोणतीही पारदर्शकता नाही


 बाबा सिद्दीकी हे नेते होते पण मुंबईत त्यांची आणखी एक ओळख होती  ती म्हणजे वांद्र्याच्या रिअल इस्टेट किंगची. एसआरएच्या दोन प्रकल्पांबाबत त्यांना बराच काळ त्रास होत होता आणि गेल्या पाच-सहा महिन्यांत हे प्रकरण खूपच बिघडले होते .  संत ज्ञानेश्वर नगर आणि भारत नगर   या दोन्ही प्रकल्पला बाबा सिद्दिकींचा विरोध होता. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्दीकी यांचा आक्षेप या प्रकल्पाला नसून झोपडीत राहणाऱ्या लोकांना अंधारात ठेवण्यात आल्याने आणि बिल्डरकडून कोणतीही पारदर्शकता नसल्याने हा आक्षेप होता. 


 झिशान सिद्दिकीने केला होता विरोध


ज्ञानेश्वर नगरच्या पुनर्विकास प्रकल्पात मुंबईतील एका बड्या उद्योगपतीची गुंतवणूक होती.  हा  एक वादग्रस्त उद्योगपती आहे. त्यांचे राजकीय संबंधही चर्चेत आहेत आणि असे म्हटले जाते की त्यांच्या  उच्चस्तरीय राजकीय संपर्कांमुळे त्यांना एका मोठ्या प्रकरणात वाचवले गेले.  तसेच मुंबईतील काही बडे नेते या बड्या प्रकल्पाचा  जोरदार प्रचार करत आहेत.  तीन महिन्यांपूर्वी या दोन्ही कंपन्यांनी येथे दहा एकर जागेवर 5500 घरे, भव्य पंचस्तरीय हॉटेल आणि व्यावसायिक जागा बांधण्याचा निर्णय घेतला. सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या टीमला बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान याने विरोध केला, त्यांना सर्वेक्षण करू दिले नाही आणि त्यामुळे टीमवर गुन्हा दाखल करण्यात आला.


प्रकरण खुनापर्यंत पोहोचले का?


भारत नगरचा पुनर्विकास मोठ्या  डेव्हलपर्सद्वारे केला जाणार होता. 44 एकर झोपडपट्टी वसाहतीतील रहिवाशांमध्ये 18 वर्षांपासून पुनर्विकासाबाबत चर्चा होत असल्याची माहिती आहे. या जमिनीचीच किंमत काही हजार कोटी रुपये आहे. भारतनगरचा एक भाग पाडण्याची योजना 30 सप्टेंबरला होती.   सिद्दीकी यांनी आधीच रद्द केली होती. कदाचित त्यामुळेच वाद वाढत गेला आणि प्रकरण खुनापर्यंत पोहोचले का याचा शोध आता पोलीस घेत आहेत.


हे ही वाचा :


बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट; घटनास्थळापासून 100 मीटर अंतरावर सापडली बॅग