Baba Siddiqui Murder Case अकोला : अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui ) यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केल्या जातं असल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, शुबू लोणकर हा लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा असल्याच म्हटल्या जातंय. शुबू हा शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास केल्या जातं आहेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुबू लोणकर ज्यांचे हे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे.


सद्यस्थितीला देखील पोलीस तपास करतायेत. शुभम लोणकर हा मूळ अकोला (Akola) जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी असल्याच समजते. या आधीही शुभम लोणकरला अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन पिस्टल त्याच्याकडून जप्त केल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणात संशयाची सुई आता शुबू लोणकर यांच्याकडे वळवण्यात आली आहे.   


शुबू लोणकर हा शुभम लोणकर असू शकतो?


शुभम लोणकर संदर्भात अकोला पोलिसांना विचारले असता, आपण त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात कारवाई केल्याचं पोलिसांनी म्हटलं होत. मात्र, आज फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर आणि शुभम लोणकर हा एकच आहे का? हे अद्याप कळू शकले नाहीये. त्यामुळं आपण याबद्दल जास्त सांगू शकणार नाही, अशी माहिती अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली.


शुबू लोणकर नेमकं काय म्हटलं फेसबुक पोस्टमध्ये


ओ३म् जय श्री राम जय भारत जीवन का मूल समजता हु, जिस्म और धन को में धूल समजता हु || किया वही सत्कर्म था जो, निभाया मित्रता का धर्म था जो || सलमान खान हम ये जंग चाहते नहीं थे पर तुमने हमरे भाई का नुकसान करवाया... आज जो बाबा सिद्दीके के शराफत के पुल्ल बंद रहे है या एक टाइम में दाऊद के साथ मकोका एक्ट में था.... इस के मरने का कारन अनुज थापन और दाऊद को बॉलीवुड, राजनीती, प्रॉपर्टी डीलिंग से जोड़ना था.... हमारी किसी से कोई दुश्मनी नहीं है पर जो भी सलमान खान और दाऊद गैंग की हेल्प करेगा अपना हिसाब किताब लगा के रखना.... हमारे किसी भी भाई को कोई भी मरवाए गा तो हम प्रतिक्रिया जरूर देगे हम ने पहले वार कभी नहीं किया.... जय श्री राम जय भारत सलाम शहीदां नू.. अशा प्रकारचे फेसबुक पोस्ट 'शुबू लोणकर' यांनी शेअर केली आहेय.


तेव्हा शुभम लोणकरवर अकोला पोलिसांकडून अशी झाली कारवाई


गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केलं होतं. अंदाजे फेब्रुवारी महिन्यात सुरुवातीलाच ही कारवाई झाली होती. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजलं होतं. त्याने अनेकांना बंदुका सप्लाय केल्या आहेत. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तपासा दरम्यान शुभम लोणकर हा या टोळीचा प्रमुख असल्यास समोर आले. शुभम हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. 'तो' गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, अकोट शहर पोलिसांनी शुभलला पुण्यातून ताब्यात घेतलं होतं. सद्यस्थितीत तो आता जामिनावर सुटका झाली होती. दरम्यान, तो सध्या बाहेर असल्याचे समजते आहे.


तेव्हा 6 जणांसह 3 बंदूक, 14 जिवंत काडतूस जप्त केल्या


या संपूर्ण तपासात अकोला पोलिसांनी 3 बंदूक 14 जिवंत काडतूस आणि काही मॅक्झिन्स जप्त केल्या आहे. ही कारवाई कार्यवाही IPS अनमोल मित्तलसह स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शंकर शेळके केली होती. तेव्हा शुभम लोणकर यांच्यासह अंकुश गायबोले (वय 30), रोहित कोकाटे (वय 25) आणि अक्षय अरबाड (वय 26) यांना देखील अटक झाली होती.


शुभम लोणकर अन् गैंगस्टर बिश्नोईच्या संपर्कातील कॉल रेकॉर्डिंग् केल्या होत्या जप्त


शुभम लोणकर हा गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या चांगला संपर्कात होताय, त्यां दोघांच्या संपर्काचे अनेक विडिओ कॉल रेकोर्डिंग फोन रेकॉर्ड पोलिसांच्या हाती लागले. दुबई, इंटरनॅशनलमधील गुन्हेगारासोबत शुभमचा चांगला संर्पक होताय. फोन कॉल'मध्ये हे सर्व समजलं होतं. विशेष म्हणजे गैंगस्टर लॉरेंस बिश्नोई हा सध्या तुरुंगात असून 700 जणांच्या टोळीचा तो प्रमुख म्हणून अशी त्याची ओळख आहे.


हे ही वाचा