Baba Siddique Murder Case मुंबई: माजी राज्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पक्षातील नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Murder Case) यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. 12 ऑक्टोबर रोजी वांद्रेमधील कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळी झाडण्यात आली. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 


बाबा सिद्दीकी (Baba Siddique Murder Case) यांच्यावर ज्या ठिकाणी गोळी झाडण्यात आली, त्याठिकाणाहून जवळपास 100 मीटरच्या अंतरावर एक बॅग सापडली होती. आरोपींनी काही अंतरावर एक बॅग फेकल्याची माहिती पोलिसांकडे होती. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आणि पोलिसांना एक बॅग सापडली. ज्यामध्ये पोलिसांना आणखी एक शस्त्र सापडले. पोलिसांची ही संपूर्ण कारवाई 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. 


बाबा सिद्दीकी प्रकरणातील मुंबई पोलिसांनी आणखी दोन जणांना घेतलं ताब्यात-


बाबा सिद्दिकी हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांच्या रूम मध्ये राहणाऱ्यांना तरुणांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातील वारजे परिसरात असलेल्या रूममधून गुल्लू आणि मोनू या 2 जणांना ताब्यात घेतलं. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. गुल्लू आणि मोनू हे दोघं धर्मराज, गुरमेल आणि शिवकुमार यांच्यासोबत राहत होते. बाबा सिद्दीकी यांची हत्या करणारे 3 तरुण हे वारजे परिसरातील बालाजी स्क्रॅप सेंटर मध्ये काम करत होते. हरीष नावाच्या ठेकेदाराने या सगळ्यांना एक रूम भाड्याने करून दिली होती. याच परिसरात असलेल्या या रूममध्ये हे पाचजण राहत होते. गुल्लू आणि मोनु यांचा काही या प्रकरणी काही सहभाग आहे का?, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.


लॉरेन्स बिश्नोई टोळीने बाबा सिद्दीकींवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली-


लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख  पटल्याची माहिती समोर आली आहे. झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच पोस्टमध्ये केला आहे. 


संबंधित बातमी:


Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी नव्हे तर कोट्यवधींच्या SRA प्रकल्पाचा विरोध नडला


बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट Video: