बीड : पवनऊर्जा क्षेत्रातील कंपनी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनिल शिंदे यांच्या तक्रारीवरुन वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेट कंपनीच्या पवनऊर्जा प्रकल्पाची कामं सुरु आहेत. ही कामं बं करण्याची धमकी देत कामं सुरु ठेवायची असल्यास 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील सुदर्शन घुलेवर केज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंद झाला आहे.
सुदर्शन घुलेला पुढे करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची फिर्याद आवादा एनर्जी प्रकल्पाचे मस्साजोग येथील सुनिल केदू शिंदे यांनी केज पोलीस ठाण्यात दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन खून करण्यात आला. या प्रकरणात देखील विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले आरोपींमध्ये आहेत. आता पवनचक्की कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्यावरुन केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सरपंच खून प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला पुढे करत पवनचक्कीच्या कंपनीला मागितले दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप करत तक्रार करण्यात आली आहे.
सुनील शिंदे यांच्या तक्रारीनुसार 29 नोव्हेंबरला ते सकाळी 10 वाजता मस्साजोग येथील अवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना विष्णू घाटेच्या मोबाइल वरून फोन आला आणि त्यांनी मला वालिमीक अण्णा बोलणार आहेत असे सांगितले. अरे ते काम बंद करा, ज्या परिस्थीती मध्ये सुदर्शनने सांगितले आहे, त्या परिस्थीतीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, काम चालू केले तर याद राखा असे म्हणून प्रकल्पाचे काम बंद बंद करणेबाबत धमकी दिली.
सुनील शिंदेंनी तक्रारीत पुढं म्हटलं की ते आणि शिवाजी थोपटे असे कार्यालयात हजर असताना दुपारी त्याच दिवशी अडीचच्या सुमारास सुदर्शन घुले रा. टाकळी हा आमचे मस्ताजोग येथील प्रकल्पाचे ठिकाणी आला व त्यांनी पुन्हा काम बंद करा, अन्यथा जी मागणी यापूर्वी केलेली आहे त्याची पुर्तता करा असे म्हणून केज मध्ये चालू असलेल्या इतर ठिकाणाची अगादा कंपनीची सर्व काम बंद करा अन्यथा तुमचे हात पाय तोडून तुमची कायमची वाट लावून टाकेन असे म्हणून धमकी दिली होती. काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे यांना वाल्मीक अण्णा कराड यांनी त्यांचे परळी येथील कार्यालयात बोलावून अवादा कंपनीचे केज तालुक्यातील सर्व काम बंद करा अन्यथा काम चालु ठेवायचे असेल तर 2 करोड रुपये द्या असे सांगितले होते, त्यानंतर वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईल वरुन प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत, असं सुनील शिंदे यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
इतर बातम्या :