Aurangabad Crime News in Marathi : औरंगाबादेत जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला एका तरुणीने आपल्या मित्रांच्या मदतीने लुबाडल्याचं प्रकरण समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, व्यापाऱ्याला त्याच्याच कार्यालयात जाऊन लुटले आहे. औरंगाबादमधील समर्थ नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. तरूणीसह दोन्ही आरोपी विरोधात क्रांतीचौक पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात तिघांनाही बेड्या ठोकल्या आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव रचना निंभोरे असे आहे. 25 वर्षीय रचना हिने आपल्या दोन मित्रासह व्यावसायिकाला कार्यालयात जाऊन लुटले. या तिघांनी कार्यालयात घुसून व्यावसायिकाला मारहाण करीत तब्बल 13 तोळे सोने ओरबाडून पोबारा केला. धक्कादायक बाब म्हणजे, या तिघांनी दिवसा ढवळ्या व्यापाऱ्याला मारहाण करत लुबाडले.
औरंगाबाद शहरातील समर्थ नगर परिसरात अशोक पाटील नावाच्या 66 वर्षीय व्यक्तीचं ऑफिस आहे. गेल्या काही दिवसांपासून रचना त्या व्यापाऱ्याला काही प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे असं सांगून त्यांच्याशी लगट करत होती. बुधवारी दुपारी दोनच्या दरम्यान ती ऑफिसमध्ये आली. त्यानंतर काही वेळातच तिचे दोन मित्रही ऑफिसमध्ये पोचले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिकाला मारहाण केली अन् लुबाडले.
व्यापाऱ्याने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांची सुत्रे फिरली. पोलिसांसमोर या गुन्ह्याचा छडा लावण्याचे आव्हान होतं. पण आरोपी सराईत नसल्याचे त्यांच्या लक्षात आलं. व्यावसायिकाला फोन केलेल्या नंबरवरुन पोलिसांनी आरोपी तरुणाचा शोध घेतला आणि बेड्या ठोकल्या. तरुणीच चौकशी केली असता दोन्ही सहकऱ्याची नावेही तिने सांगितली. त्यानंतर त्या दोघांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दरम्यान, या प्रकरणाचा शोध पोलिस घेत आहेत. त्याशिवा या तिघांनी यापूर्वी अशा प्रकारच्या काही घटना केल्या आहेत का? याचा क्रांतीचौक पोलिस शोध घेत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
Holi: होळी आधीच मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधींच्या अमली पदार्थांसह दोघांना अटक
Aurangabad : बांधकाम विभागातील अधिकाऱ्याकडे सापडले कोट्यवधींचं घबाड! ACB अधिकाऱ्यांचेही डोळे चकाकले
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live