Self-Immolation :  राज्यात प्रजासत्ताक दिनी राज्यातील दोन शहरातून (self-immolation) आत्मदहन केल्याच्या घटना समोर आल्या आहे. पहिली घटना बारामती शहरातून आणि तर दुसरी घटना धुळ्यात घडली आहे. दोन्ही ठिकाणी आत्मदहन करण्याचे कारणं वेगळी असली तरीही प्रजासत्ताक दिनी आत्मदहण करण्याचा प्रयत्न केल्याने दोन्ही शहरात खळबळ उडाली आहे.


शेतात जायला रस्ता नसल्याने...


बारामतीत प्रजासत्ताक दिनाच्या ठिकाणी एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. बारामती तालुक्यातील  निरावागज येथील घटना आहे. अनेक लोक अनेक कारणाने आत्मदहनाचा प्रयत्न करतात मात्र बारामतीतील या व्यक्तीने शेतात जायला रस्ता मिळत नसल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.आत्मदहनाचा प्रयत्न करताना परिसरात मोठा गोंधळ झाला होता. या सगळ्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती आणि कुटुंबियांनीदेखील आक्रोश केला. त्यानंतर पोलिसांनी आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं.दत्तात्रेय शिवाजी भोसले असं या व्यक्तीचं नाव आहे. शेतातील रस्त्याच्या प्रश्ना बाबत होत असलेल्या अन्यायाबाबत प्रशासनाने दखल न घेतल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. 


घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून...


दुसरी घटना नाशिक जिल्ह्यातील धुळे शहरात घडली आहे. धुळे शहरातील चित्तोड रोड मिल परिसरातील नागरिकांनी आपण राहत तुळसाबाईचा मळा या ठिकाणी गेल्यात 35 ते 40 वर्षापासून राहत आहेत. ते राहत असलेल्या घरांचा हक्काचा सातबारा मिळावा म्हणून धुळे जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त व भूमि अभिलेख कार्यालयाकडे सातत्याने मागणी लावून धरली होती. मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकार्यालयावर आत्मदहनाचा इशारा दिला होता. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण झाल्यानंतर या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर येत घोषणाबाजी करत स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बंदोबस्तावर असलेल्या सतर्क पोलिसांनी या आंदोलन करताना डिझेलच्या बाटल्या हिसकवत त्यांना ताब्यात घेतले आहे त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे सर्व आंदोलन करताना शहर पोलिसांनी ताब्यात घेण्यात आली आहे.


दोन्ही घटनेत मोठा अनर्थ टळला...


दोन्ही शहरातील घटनेतील व्यक्तींनी शासनाने वेगवेगळ्या कारणास्तवर दखल न घेतल्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. एकीकडे प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष सुरु असताना या दोन्ही घटना पुढे आल्या आहेत. या दोन्ही घटनेत मोठा अनर्थ टळला आहे आणि दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत.