Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला अटक करण्यासाठी पोलिसांनी आखलेल्या ‘स्मार्ट’ प्लॅनची आता जोरदार चर्चा रंगली आहे. चोर शिरल्याचा बनाव करत पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचत त्याला घरातूनच बेड्या ठोकल्या, ही कारवाई अत्यंत गुप्त आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडल्याचे समोर येत आहे.

Continues below advertisement

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अशोक खरातला अटक करण्यासाठी वेगळाच डाव आखला होता. आरोपी राहत असलेल्या परिसरात चोर शिरल्याचा बनाव केला. चोराला पकडण्यासाठी पोलीस परिसरात झडती घेत असल्याचे सांगत पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला. याचाच भाग म्हणून काही पोलिसांनी खरातच्या घराचीही तपासणी सुरू केली. दरम्यान, घरात उपस्थित असलेल्या अशोक खरातला पाहताच पोलिसांनी क्षणार्धात कारवाई करत त्याच्या मुसक्या आवळल्या. या अनपेक्षित हालचालीमुळे आरोपीला पळून जाण्याची संधीच मिळाली नाही.

Ashok Kharat Nashik Crime News: पहाटे अटक, कार्यालयातून पेन ड्राइव्ह जप्त  

गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. 18) पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, कॅनडा कॉर्नर येथील त्याच्या कार्यालयाची झडती घेतली असता पोलिसांना एक पेन ड्राइव्ह मिळाला. त्यामध्ये तब्बल 58 व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली असून, या व्हिडिओंची सखोल चौकशी सुरू आहे. या पुराव्यांमुळे तपास अधिक गंभीर व व्यापक होण्याची शक्यता आहे.

Continues below advertisement

Ashok Kharat Nashik Crime News: नेमकं प्रकरण काय?

अशोक खरात याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाणे येथे अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. आरोपी अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाल्यानंतर ‘कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट’ आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध झाला होता. अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी अशोक खरातची पाद्यपूजा केल्याचा फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

आणखी वाचा 

Ashok Kharat Nashik Crime News: प्रसादाच्या नावाखाली कडवट चवीचं पाणी पाजलं, महिलेला गुंगी येताच वासनांध अशोक खरातचे काळे कारनामे; नेमकं काय घडलं?