Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणारा आणि अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढणारा अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन याच्या पाशवी कृत्यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका महिलेने दाखवलेल्या धाडसामुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला त्याचा भोंदूगिरीचा आणि अत्याचारांचा कथित प्रकार अखेर उघडकीस आला. पोलिसांनी बुधवारी (दि. 18) त्याला अटक केली असून न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जप्त करण्यात आलेल्या पेनड्राईव्हमधील माहितीमुळे तपास अधिकच गंभीर व धक्कादायक वळणावर पोहोचला आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: ‘दैवी शक्ती’च्या नावाखाली विश्वासघात

कॅनडा कॉर्नर परिसरातील ओकस प्रॉपर्टीज कार्यालयात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. सिडको परिसरात राहणाऱ्या 28 वर्षीय पीडितेला विवाह जुळत नसल्याने तिच्या मेहुण्याने ऐकीव माहितीवरून मार्च 2019 मध्ये खरातकडे नेले. खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत मंत्र-तंत्राद्वारे सर्व समस्या सोडवू शकतो, असा विश्वास निर्माण केला. 2020 मध्ये कोरोनामुळे विवाह लांबल्यानंतर 2021 मध्ये पुन्हा लग्न ठरल्यावर त्याने ‘खडा’ (रत्न) घालण्याचा सल्ला दिला.

पीडितेने काही दिवसांनी तो खडा काढल्यावर लग्न मोडले. त्यामुळे कुटुंबीयांमध्ये भीती निर्माण झाली. त्यानंतर खरातने मोठ्या रकमेचे नवे खडे देत पुन्हा विधी करण्यास भाग पाडले. सिन्नर येथील मंदिरात पूजा करण्याच्या नावाखालीही पैसे उकळल्याचे समोर आले आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: भीती, धमक्या आणि मानसिक छळ

“खडा काढल्यास लग्न मोडेल”, “विधी न केल्यास पतीचा जीव जाईल” अशा धमक्या देत खरातने पीडितेवर मानसिक दबाव टाकला.  लग्नानंतर सन २०२२ मध्ये खरातने पीडितेला प्रसादाच्या नावाखाली पेढा आणि खारट कडवट चवीचे पाणी प्यायला दिले. पीडितेला गुंगी आल्यानंतर बलात्कार केला. लगानंतर सन २०२३ मध्येही पीडितेच्या पतीला चेंबरबाहेर बसवून संशयिताने तिच कृती केली. एकावेळी पीडितेला शारीरिक इजा होत रक्तस्त्राव देखील झाला. 

Ashok Kharat Nashik Crime News: तीन वर्षे सुरू होता अत्याचार

नोव्हेंबर 2022 ते डिसेंबर 2025 या कालावधीत “कोणाला सांगितल्यास जीव मारेल”, “चारित्र्य खराब करून आयुष्य उद्ध्वस्त करेल” अशा धमक्या देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. अखेर 15 मार्च 2026 रोजी पीडितेच्या मेव्हण्याला खरातच्या भोंदूगिरीबद्दल माहिती मिळाली. त्यांनी विश्वासात घेतल्यावर पीडितेने आपली आपबीती सांगितली. त्यानंतर 17 मार्च रोजी तिने सरकारवाडा पोलीस ठाणे येथे धाव घेत तक्रार दाखल केली.

Ashok Kharat Nashik Crime News: पोलिसांची कारवाई आणि धक्कादायक पुरावे

तक्रार मिळताच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक आयुक्त संदीप मिटके आणि गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने कर्मयोगीनगर येथील ‘तृप्तबाला’ बंगल्यावर छापा टाकून खरातला अटक केली. तपासादरम्यान त्याच्या कार्यालयातून पेनड्राईव्हसह महत्त्वाचे डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले. या पेनड्राईव्हमध्ये अनेक व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली असून, त्यांची तपासणी सुरू आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातविरोधात याआधीही तक्रारी

खरातचे राज्यात आणि परराज्यात मोठे जाळे असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडे अनेक राजकीय नेते, उद्योजक, अधिकारी आणि उच्चशिक्षित महिलाही जात असल्याची माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या दाव्यानुसार, काही उद्योजिका, व्यावसायिका, राजकीय पदाधिकारी आणि अधिकारी वर्गातील महिलाही त्याच्या अत्याचारांच्या जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता आहे. यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत अशोक खरात विरोधात तक्रारी झाल्या होत्या, मात्र ठोस कारवाई झाली नव्हती.

आणखी वाचा 

Ashok Kharat Nashik Crime News: डोक्यावर तांब्या ठेवला, महिला पाठमोरी उभी...; पुढे अशोक खरातकडून गैरवर्तन, आक्षपार्ह व्हिडीओ समोर