Ashok Kharat Nashik Crime News: नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, या संपूर्ण दुष्कृत्याचा खरा मास्टरमाईंड कॅप्टन खरातचा 'खास' व ऑफिसबॉय संशयित नीरज जाधव असल्याचे समोर आले आहे.
अशोक खरातने महिलांचे लैंगिक शोषण केले. मात्र त्या शोषणाचे भांडवल करून 58 महिलांची लाज विकण्याचा डाव नीरजने रचल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहून राज्य शासनाने तपासासाठी 'एसआयटी' स्थापन केली आहे. गुरुवारी (दि.19) सकाळी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांनी नाशिकमध्ये दाखल होत अशोक खरातची दोन तास कसून चौकशी केली आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले
नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथील 'ओजस प्रॉपर्टीज' या कार्यालयात स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातने अनेक महिलांवर केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ, मॉर्फ व्हिडिओ, फोटो व पुरावे सीसीटीव्हीच्या रूपाने जतन केले होते. खरातचा विश्वासू असलेला नीरज जाधव याने डिसेंबर 2025 साली खरातच्या नकळत कार्यालयातून या 58 महिलांवरील अत्याचाराचे फुटेज चोरले. नीरजच्या मनात पैशांची हाव निर्माण झाली. त्याने या व्हिडीओंच्या जोरावर खरातलाच ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे.
Ashok Kharat Nashik Crime News: नीरजने आपला मोर्चा पीडित महिलांकडे वळवला
नीरज आणि त्याच्या साथीदारांनी या क्लिप्सच्या बदल्यात खरातकडे 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. मात्र, खरातने या मागणीला दाद न देता पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करीत थेट वावी पोलिसांत फिर्याद नोंदविली होती. त्यामुळे नीरजने आपला मोर्चा थेट पीडित महिलांकडे वळवून त्यांच्या अब्रूचा बाजार मांडला. यानंतर, नीरज व इतरांनी शिर्डीतील एका 24 वर्षीय विवाहितेचे मॉर्फ फोटो आणि काही व्हिडीओ थेट तिलाच व्हॉट्सअॅपवर पाठवून धमकावले होते.
Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातच्या वासनांधाचा खरा चेहरा जगासमोर
पीडिता मंदिरात दर्शन घेत असताना नीरजसह संशयिताने तिला गाठून व्हिडीओ दाखविले. ती घाबरली व तिने ही बाब खरातला सांगितली. पण खरातने स्वतःला वाचवण्यासाठी तिलाच पोलिसात जाण्यास सांगितले. खरातकडून पैसे मिळण्याची आशा मावळताच नीरजने सिडकोतील 28 वर्षीय विवाहितेचा व्हिडीओ तिच्या मेहुण्याला पाठविला. नीरजचा हाच मास्टरस्ट्रोक त्याच्यावर आणि खरातवर उलटला. मेहुण्याने धीर दिल्याने या पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले आणि फिर्याद देत अशोक खरातच्या वासनांधाचा खरा चेहरा जगासमोर आणला.
Ashok Kharat Nashik Crime News: एसआयटीकडून तपास सुरु
दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे राज्यातील बडे राजकीय नेते, मंत्र्यांशी आणि सेलिब्रिटींशी जोडले गेल्याचे पाहून राज्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी तातडीने एसआयटी स्थापन केली आहे. पुणे येथील एसआरपीएफ च्या बल गट क्र. एकच्या समादेशक तेजस्वी सातपुते या पथकाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी गुरुवारी सकाळी नाशिक शहर गाठून सर्व कागदपत्रे हाती घेतली आहेत. तर, नीरजला एसआयटीसह शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले असून सखोल तपास सुरू आहे.
आणखी वाचा
