Ashok Kharat Case Nashik Crime News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशोक खरातला आज चौथ्या गुन्ह्यासाठी नाशिक सत्र न्यायालयात VC द्वारे हजर करण्यात आले होते. दरम्यान, अशोक खरातची सासू आणि कल्पना खरातची (Kalpana Kharat) आई पार्वती शिंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना महत्वाची माहिती दिली. मी एक महिन्यापासून इथे आली आहे. काय चौकशी होते आम्हाला काही माहिती नाही. कल्पना कुठे आहे मला माहिती नाही. तिच्याशी फोनवर बोलणे झाले नाही. हे कधी थांबेल सांगता येत नाही, असं पार्वती शिंदेंनी सांगितले. (Ashok Kharat Case)
अशोक खरात काय करायचा माहीत नाही. अधिकारी कुटुंबीयांसोबत चौकशी करत आहेत, मला माहिती नाही. माझी चौकशी झाली नाही. मला काहीच माहिती नाही. मी शिक्षित नाही, मला नीट बोलताही येत नाही, असंही पार्वती शिंदे यावेळी म्हणाल्या. तसेच अशोक खरातने केलेल्या कारनाम्यावर विचारले असता, तो जात होता, त्याच्या ऑफिसमध्ये तिकडे जाऊन काय करायचा माहिती नाही. मला आणि कल्पनाला काहीच माहिती नव्हते, असं पार्वती शिंदेंनी सांगितले. तसेच अशोक खरातला शिक्षा व्हायला हवी की नाही, असा प्रश्न विचारल्यास शिक्षा नाही व्हायला हवी, पण त्याला आता कोण सोडवणार...असंही पार्वती शिंदेंनी सांगितले. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
नाशिक सत्र न्यायालयात काय घडलं? (Ashok Kharat Case Hearing Nashik Court)
सरकारी वकील काय म्हणाले?
- महिलांना ताब्यांच्या भांड्यातील पाणी, पेढा खाऊ घालायचा
- त्यात तो गुंगीचे औषध टाकत होता
- त्यात काय औषध टाकत होता, याचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी 5 दिवसाची कोठडी द्यावी.
- मी देवाचा अवतार आहे,दिवशी संबंध ठेवल्याने तू पवित्र झाली आहे. कोणाला याबाबत काही सांगू नको असं आरोपी सांगायचा...
- महिलेला पाणी देत होता, भोंदूगिरी करून तो रत्न देत होता त्यासाठी 5 दिवस कोठडी द्या..
आरोपी अशोक खरातचे वकील काय म्हणाले? (Ashok Kharat Case Hearing Nashik Court)
- मागील 3 केसमध्ये कोठडीसाठी हाच युक्तिवाद सरकारी वकील यांनी केला होता.
- काय द्रव दिले याचा तपास एसआयटीकडे आहे, त्यामुळे याचा तपास झाला आहे.
- पुन्हा या गुन्ह्यासाठी 5 दिवसांची पोलीस कोठडीची गरज नाही.
सरकारी वकील काय म्हणाले? (Ashok Kharat Case Hearing Nashik Court)
- आरोपीची मोडस ऑपरंडी जरी सारखी असली तरीही अनेक महिला आहे. विधवा आहेत, विवाहित आहेत. त्यामुळे त्याने केलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी आरोपीला कोठडी द्या...
न्यायाधीशांनी कोणता निकाल सुनावली? (Ashok Kharat Case Hearing Nashik Court)
- आरोपी अशोक खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी...
संबंधित बातमी:
Ashok Kharat Case Nashik Crime News: सुनावणी सुरु असताना थांबवली; मग महिला पोलिसांच्या मोबाईलवरुन व्हिडीओ कॉल आणि अशोक खरातला थेट प्रश्न, कोर्टात काय घडलं?