Anjangaon Statue Issue सोलापूर : माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणात (Anjangaon Statue Issue) पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. अंजनगावला पुतळा पाठवणाऱ्या बाळराजे आवारेचा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कारखाना पोलिसांनी सील केला होता. तसेच या प्रकरणात आतापर्यंत आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. तरआतायाप्रकरणी 6 आरोपींना (Crime News) अटक करण्यातआलीआहे. माढा तालुक्यातील अंजनगाव पुतळा प्रकरणात (Anjangaon Statue Issue) शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यातआल्याचीमाहितीआहे.

दरम्यान, अंजनगाव येथे जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कामात अडथळा आणल्याप्रकरणी हि अटक करण्यातआलीआहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील हाके यांचे सहकारी शिवम वाघमोडे, बाळू वाघमोडे, सतीश वाघमोडे, बंडू वाघमोडे, अरुण वाघमोडे, नितीन वाघमोडे यांना पोलिसांनी अटक केलीआहे. पोलिसांनी अटक केलेले सर्व आरोपी हे अंजनगाव येथील स्थानिक ग्रामस्थ आहेत, अशीदेखीलमाहितीआहे.

Anjangaon Statue Issue : शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी 6 आरोपींना अटक

दरम्यान, पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी या आधीच 12 आरोपीना पोलिसांनी अटक केली असून त्यातील 10 जण अजूनही न्यायालयीन कोठडीत आहेत. मौजे अंजनगाव तालुका माढा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवल्याप्रकरणी दिनांक 1 एप्रिल 2026 रोजी पासून गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. गावातील दोन्ही समाज एकमेकांसमोर आंदोलनाकरिता बसले होते. अशावेळी प्रशासनाने जागेची मोजणी करून घेण्याबाबत समन्वय्याने तोडगा काढला होता. परंतु मोजणी करताना मोजणी अधिकारी यांच्या कामात हस्तक्षेप करून कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Anjangaon Crime News: अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे

शिवम भारत वाघमोडे वय -27 रा. अंजनगाव ता.माढा जि- सोलापूर

बाळू नवनाथ वाघमोडे वय- 31 रा.अंजनगाव ता.माढा जि- सोलापूर.

सतीश हनुमंत वाघमोडे वय- 25 रा.अंजनगाव ता.माढा जि- सोलापूर.

बंडू दिगंबर वाघमोडे वय - 35 रा.अंजनगाव ता.माढा जि- सोलापूर.

अरुण सुभाष वाघमोडे वय 32 रा.अंजनगाव ता.माढा जिल.सोलापूर.

Anjangaon Crime: विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार

सोलापूर जिल्ह्यात विनापरवाना पुतळा (Statue) उभारल्यास थेट एफआयआर (FIR) दाखल करून 4 तासात पुतळा हटवणार, असा मोठा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. यासह विनापरवाना उभारण्यात आलेल्या पुतळ्याची माहिती लपवल्यास सात दिवसात पोलीस पाटलाचे निलंबन देखील होणार असल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील (Solapur News) विनापरवाना उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यांच्या (Statue Issue) प्रकरणावर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ यांचे संयुक्त परिपत्रक जारी करण्यात आला आहे.

इतरमहत्वाच्याबातम्या