बीड : मधील गोळीबार प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी बीड जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांबाबत ट्विट करत सवाल उपस्थित केले आहेत. परभणीत 32 आणि अमरावती ग्रामीणमध्ये 243 परवाने असताना एकट्या बीडमध्ये 1,222 शस्त्र परवानाधारक का? असा सवाल विचारत दमानियांनी एक व्हिडीओ पोस्ट केला. दमानियांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हवेत गोळीबार करताना दिसतोय. वाल्मिक कराडच्या नावावर परवाना असताना, विनापरवाना कैलास फड आणि निखील फड बंदूक कशी चालवतात? असा सवाल दमानिया यांनी विचारला. बीड पोलिसांनी या तरुणांना अटक करावी आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली.


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक व्हिडीओ शेअर करत सरकारला प्रश्न विचारला होता. या व्हिडीओमध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड हा हवेत गोळीबार करताना दिसत आहे. दमानिया यांनी याबाबत तक्रार नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 




बीडमधील शस्त्र परवान्याबाबत भाजपचे आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये प्रश्न विचारला होता. तरुण पोरं कमरेला शस्त्र लावून जिल्ह्यात दहशत पसरवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. 


वाल्मिक कराड हे मुंडेंच्या कंपनीत भागिदार


बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून वातावरण दिवसेंदिवस तापतच चाललंय. या हत्येप्रकरणी एका नावावरून वाद पेटलाय तो म्हणजे वाल्मिक कराड. संतोष देशमुख हत्याप्रकरणात कराडचं नाव थेट आलेलं नसलं तरी त्याच्यावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवलीय. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे वेंकटेश्वरा इंडस्ट्रियल आणि जगमित्र शुगर्स या दोन कंपन्यांमध्ये भागिदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. जगमित्र शुगर्सच्या सातबारावर या दोघांची एकत्र नावं असल्याचं त्यांनी सांगितलंय. 


बीडमध्ये गँग्ज ऑफ वासेपूर, सुरेश धस यांचा आरोप


एकीकडे विरोधकांकडून धनंजय मुंडे टार्गेट होत असताना दुसरीकडे महायुतीतल्याच भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यस्था आहे की नाही? हा प्रश्न उपस्थित त्यांनी केला. तसंच जिल्ह्यात गँग्ज ऑफ वासेपूर सुरू असल्याचाही गंभीर आरोप धस यांनी केला. केवळ एवढंच नव्हे तर, बीडच्या मागच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदासह पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं होतं असं त्यांनी म्हटलंय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांनी बीडचं पालकमंत्री स्वीकारायला हवे, अशी मागणीही त्यांनी केली.  


ही बातमी वाचा: