शिर्डी : शिर्डीतील नेवासे येथे एक धक्कादायक प्रकार घडला आहे. आईनं काका आणि मावशीच्या मदतीनं आपल्या 13 वर्षांच्या मुलीचा बालविवाह केला होता. परंतु, बालविवाहानंतर मुलीवर सासरच्यांकडून अत्याचारही करण्यात आल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अवघ्या 13 वर्षांच्या मुलीशी बालविवाह करून तिला मारहाण करणाऱ्या नवऱ्यासह नातेवाईकांविरोधात नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंनिसच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांच्या पाठपुराव्यानंतर अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बायको नांदत नाही नवऱ्यानं मांत्रिकाकडे उपचार घेतले होते. या मंत्रिकावरही जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेवासा तालुक्यातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्याचं आईनं काका आणि मावशीच्या संगनमतानं नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथील 24 वर्षीय मुलाशी लावून दिला. काही दिवस आपल्याजवळ ठेवल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या आजोबांना कोणतीही माहिती न देता सासरी पाठवलं. मात्र सासरी गेल्यावर या अल्पवयीनं मुलीचा मोठ्या प्रमाणावर छळ केला जाऊ लागला. नवऱ्यासह सासू विविध कारणांनी मारहाण करत असलायची तक्रार मुलीनं दिली आहे. 4 महिने नवऱ्यानं इच्छा नसताना शारीरिक संबंधही ठेवले तर कायम मारहाणसुद्धा केली असल्याचा आरोप या अल्पवयीन मुलीनं केला आहे. चार महिन्यानंतर सादर मुलगी काम करत नाही. तिला बाहेरची बाधा झाली असलायचं सांगत सासरच्यांनी तिला आईकडे आणून सोडलं. यावेळी आईनं तिला राहुरी तालुक्यातील एका मांत्रिकाकडे घेऊन जात, अघोरी उपचारसुद्धा केल्याचा आरोप मुलीनं केला आहे. हे सर्व प्रकरण मुलीच्या आजोबांना समजल्यावर त्यांनी तत्काळ अंनिसच्या रंजना गवांदे यांना हकीकत सांगितली. अंनिसच्या माध्यमातून हे प्रकरण समोर आलं.
दरम्यान अखेर गवांदे यांच्या पाठपुराव्यानंतर आणि अल्पवयीन मुलीच्या आजोबांच्या साथीनं या मुलीच्या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, बाल लैंगिक अत्याचारांसोबतच इतरही अनेक कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :