Amravati Crime News : अमरावती शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात शहरातील भाजी बाजार परिसरात एकाची हत्या करण्यात आली आहे. का सोमवारच्या रात्री 9 वाजताच्या सुमारास 50 वर्षीय पवन वानखेडे यांची हत्या करण्यात आली आहे. तीन ते चार जणांनी मिळून मृतक पवन वानखेडे याच्या छातीवर आणि गळ्यावर चाकूने वार करून हि हत्या केल्याची माहिती आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र या घटनने भाजी बाजार परिसरासह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Continues below advertisement

Amravati Crime News : संतप्त मृतकच्या नातेवाईक आणि इतरांकडून परिसरा तोडफोड, आरोपींचं शोध सुरु

दरम्यान, या हत्येच्या घटनेची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यांनतर संतप्त मृतकच्या नातेवाईक आणि इतरांकडून भाजी बाजार परिसरा तोडफोड केल्याचेही माहिती आहे. परिणामी भाजी बाजार परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता आहे. तर दुसरीकडे या हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून पोलीस आरोपींचं शोध घेताय.

Continues below advertisement

Bhandara Crime : पाच वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात लाखांदूर कडकडीत बंद

भंडाऱ्याच्या लाखांदूर इथं मागील आठवड्यात पाच वर्षीय चिमुकलीवर 15 वर्षीय परप्रांतीय मुलानं अत्याचार केला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करताना पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून या आरोपी मुलाला ताब्यात घेतलं असून त्याची बाल सुधारगृहात रवानगी केली. समाजमन हादरवून सोडणाऱ्या या घटनेच्या निषेधार्थ आज सकल हिंदू समाज आणि सर्वपक्षीय नेत्यांनी लाखांदूर बंदची हाक दिली होती. लाखांदूर येथील छोट्यामोठ्या सर्व प्रकारच्या व्यावसायिकांनी दुकान कडकडीत बंद ठेवत याला प्रतिसाद दिला. दुपारी 1 वाजताच्या सुमारास लाखांदूर येथील टी पॉईंटवरून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुरुषांच्या बरोबरीनं शेकडो महिला आणि तरुणी यात सहभागी होतं रस्त्यावर उतरल्यात. अत्याचार करणारा आरोपी मुलाच्या परप्रांतीय कुटुंबाला शहरातून बाहेर काढावं, पीडितेच्या कुटुंबाला संरक्षण देऊन प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं, सर्व परप्रांतीयांची चौकशी करावी, यासह विविध मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यातं आला.

इतर महत्वाच्या बातम्या