Ahemadnagar News Updates : अहमदनगरला कर्जत तालुक्यातील कौडाणे येथे जावयाला टेम्पो खाली चिरडून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. यामध्ये दत्तात्रय जाणू मुळे यांचा मृत्यू झाला आहे. विनोद प्रशांत गोल्हार याने सुद्रीक कुटुंबियांच्या सांगण्यावरून हा टेम्पो अंगावर घातल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघांना अटकही करण्यात आली आहे.
दत्तात्रय मुळे यांची कौडाणे येथे सासुरवाडी आहे. ते सासुरवाडीतून मुलाला घेऊन येण्यासाठी गेले होते. मात्र मुलाला सोबत पाठविण्यास सुद्रीक कुटुंबियांनी नकार दिला. रवींद्र बाबासाहेब सुद्रीक यांच्या सह इतरांनी मुळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावर टेम्पो घाल असं सांगण्यात आलं असं फिर्यादीत म्हटले आहे. टेम्पोची धडक लागून मुळे यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.