Wardha Crime News: वर्ध्यात आज की धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील प्रसिद्ध असलेल्या महावीर गार्डन येथे गुरुवारी रात्री आठ वाजताच्या दरम्यान गार्डनच्या तिकीट काउंटरवर कार्यरत असलेल्या 42 वर्षीय महिलेवर एकतर्फी प्रेमातून अॅसिड हल्ला झाल्याची घटना घडली आहे. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. विजय चाफले, असं आरोपाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी महिलेला गार्डनच्या इतर कर्मचाऱ्यांनी सेवाग्राम हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. या घटनेची माहिती मिळतातच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपाला अटक केली आहे. 


शहराच्या मधोमध असलेल्या प्रसिद्ध महावीर गार्डन या ठिकाणी नागरिक रोज मोठ्या संख्येने येत असतात. त्यामुळे रोज शेकडो लोकांची याठिकाणी ये-जा सुरु असते. गार्डनमध्ये खेळणी आणि खाद्यपदार्थांची दुकान असल्याने मोठ्या संख्येने रोज शहरातील नागरिक परिवार आणि मित्र-मैत्रिणींसह या ठिकाणी येत असतात. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे.


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट


घटना घडताच रामनगर पोलीस ठाण्याला गार्डन कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोलंकी, उपविभागीय पुलिस अधिकारी पियुष जगताप, ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. 


या घटनची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, एकतर्फी प्रेमातून एका 50 वर्षीय व्यक्तीने 42 वर्षाच्या महिलेवर शौचालय धुण्याचं अॅसिड फेकलं. या हल्ल्यात महिलेच्या मानेला आणि पाठीवर गंभीर जखम झाली आहे. या हल्यात महिलेच्या चेहऱ्यावर जखम झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पुढे सांगितलं की, या घेणंही माहिती मिळतच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महिलेला तातडीने वैदकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. सध्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना गंभीर असली तरी सुदैवाने महिलेला गंभीर जखम झाली नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे. आम्ही याप्रकरणी अधिक तपास करत आहोत. आरोपाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या अॅसिड हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.            


इतर महत्वाच्या बातम्या: 


Karnataka Bhavan : सीमाभागात मराठी भाषिकांची गळचेपी होत असताना महाराष्ट्रात 'कर्नाटक' नाव कशासाठी? कणेरी मठातील कर्नाटक भवनला शिवसेनेचा विरोध