Mumbai Crime News मुंबई: मुंबईतील एक धक्कादायक घटना (Mumbai Crime News) घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
पीडीत महिला सीएसएमटी स्थानकाबाहेर 22 सप्टेंबरच्या रात्री एकटीच असताना दोन अज्ञात व्यक्ती तिथे आले. यातील एकाने महिला आरडा-ओरड करेल या अनुशंगाने तिचे तोंड धरले. सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल-
सदर प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रथम सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. हाच गुन्हा आता पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. याचदरम्यान मुंबईतील या घटनेनं खळबळ उडाली आहे. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे परिसरात नेहमीच वर्दळ असते. मात्र असे असताना देखील महिलेवर अत्याचार झाल्याने पुन्हा एकदा सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 22 सप्टेंबरच्या रात्री सीएसएमटी रेल्वे परिसरात पीडित महिला उभी होती. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती तिच्याजवळ आले. यातील एकाने महिला आरडा-ओरड करेल या अनुशंगाने तिचे तोंड धरले, असं महिलेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.
आयफोनसाठी डिलिव्हरी बॉयची हत्या-
ऑनलाईन आयफोन मागवून डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधून समोर आली आहे. आयफोनची डिलिव्हरी देण्यासाठी गेलेल्या 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयची हत्या करण्यात आली. ग्राहकाने फिल्पकार्टवरुन कॅश ऑन डिलिव्हरी पर्यायाने आयफोन मागवला होता. डिलिव्हरी बॉय ग्राहकाला फोन द्यायला गेला असता, त्याने निष्पाप डिलिव्हरी बॉयची हत्या केली. आयफोनची दीड लाख रुपये किंमत द्यावी लागू नये, यासाठी आरोपीनं असं केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. का डिलिव्हरी बॉयची हत्या करून त्याचा मृतदेह गोणीत भरून इंदिरा कालव्यात फेकून दिला होता. डिलिव्हरी बॉय भरत साहू आयफोन देण्यासाठी चिन्हाट येथील गजाननच्या घरी पोहोचला होता. यावेळी त्याची क्रूरपणे हत्या करण्यात आली.