Bank News : देशातील एका सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने विध्यार्थ्यांसाठी  झिरो बॅलन्स सेव्हिंग खाते योजना (Zero Balance Savings Account Plan) सुरू केली आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) करोडो ग्राहकांसाठी ही खास योजना आणली आहे. बँकेने 16 ते 25 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी 'BoB BRO बचत खाते' योजना सुरू केली आहे. तरुण ग्राहकांना बँकिंग सेवेशी जोडण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेत समाविष्ट असलेल्या लोकांना इतरही अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत.ही योजना (बँक ऑफ बडोदा लेटेस्ट सेव्हिंग अकाउंट) तरुणांना डोळ्यासमोर ठेवून आखण्यात आली आहे.


किमान शिल्लक राखण्याची आवश्यकता नाही


बँक ऑफ बडोदाच्या ‘BoB BRO बचत खात्या’ मध्ये खाते उघडणाऱ्यांना किमान शिल्लक राखणे आवश्यक नाही. बँकेने इतरही अशाच अनेक सेवा आणल्या आहेत.या नवीन बचत योजनेबाबत बँकेचे मुख्य महाव्यवस्थापक रवींद्र सिंग नेगी म्हणाले की, ग्राहकांना बँकिंगच्या जगाशी जोडण्यासाठी ही नवीन योजना आणण्यात आली आहे. याशिवाय ग्राहकांच्या बँकिंग गरजांचीही काळजी घेतली जाईल.


'BoB BRO बचत खाते' मध्ये ग्राहकांना 'या' सुविधा 


बँक ऑफ बडोदा या योजनेअंतर्गत आपल्या ग्राहकांना आजीवन मोफत RuPay प्लॅटिनम डेबिट कार्ड सुविधा प्रदान करेल.


या योजनेअंतर्गत, 16 ते 25 वर्षे वयोगटातील ग्राहकांसाठी शून्य बँक खाते उघडले जाऊ शकते.


ही योजना ग्राहकांना ऑटो स्वीपचा लाभ देखील देते.


यामध्ये डेबिट कार्डवरील ग्राहकांना आघाडीच्या ब्रँड्सवर अनेक ऑफर्स मिळतील.


ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा मोफत दिला जातो.


यामध्ये अगणित मोफत चेक पाने उपलब्ध आहेत.


नेट बँकिंग सेवा मोफत दिली जाते.


या योजनेत ग्राहकांना मोफत ईमेल अलर्ट आणि एसएमएस सेवा मिळेल.
यामध्ये शून्य प्रक्रिया शुल्कासह सवलतीच्या दरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


बँकांमध्ये तब्बल 12 हजार 779 कोटी रुपये पडून, हे पैसे नेमके कोणाचे?