Youtuber Mrbeast News : अलीकडच्या काळात अनेक तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो रुपये कमावत आहेत. तरुण नवनवीन प्रयोग करत आहेत. Youtube हे तरुणांच्या मिळकतीचे एक प्रभावी माध्यम झालं आहे. अनेत तरुण यामाध्यमातून चांगला नफा मिळवत आहेत. यामधीलच एक नाव म्हणजे लोकप्रिय YouTuber मिस्टरबीस्टने (Mrbeast). मिस्टरबीस्टने एका व्हिडिओच्या माध्यमातून 250000 डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. जिमी डोनाल्डसन (Jimmy Donaldson) हा मिस्टरबीस्ट या नावाने प्रसिद्ध आहे. मिस्टरबीस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर व्हिडिओ पोस्ट केला होता. यातून है पैसे कमावले आहेत.
एलन मस्कने ने यापूर्वी ट्विटरवर video टाकण्याची विनंती MrBeast ने नाकारली होती. मात्र, ही विनंती नाकारली होती. तो ट्वीटरवर त्याचे व्हिडिओ अपलोड करणार नाही असे त्याने सांगितले होते. कारण, व्हिडिओ बनवण्याच्या खर्चाचा एक भाग देखील कमावता येणार नाही. मात्र, त्यानंतर त्याने एक जुना व्हिडिओ पोस्ट केला ज्याला 15.5 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले. याबाबतची माहिती स्वत: MrBeast ने दिली आहे. माझ्या पहिल्या व्टीटरवरील व्हिडिओने 250,000 पेक्षा जास्त कमाई केली आहे. या व्हिडीओवर जाहिरातदारांनी लक्ष वेधले आहे. माझ्या व्हिडिओंवर जाहिराती विकत घेतल्या यामुळं मोठी कमाई झाल्याचे जिमी डोनाल्डसनने म्हणजेच Mrbeastसांगितले.
MrBeast च्या फॉलोअर्सची संख्या किती?
फोर्ब्सचा अंदाजानुसार MrBeast 2022 मध्ये, MrBeast YouTube चॅनेलच्या माध्यमातून वर्षभरात 54 दशलक्ष डॉलर कमवले होते. तेव्हापासून, लाखो लोकांनी त्याच्या यूट्यूब चॅनेलला फॉलो केलं आहे. त्यामुळं सध्या MrBeast ची एकूण फॉलोअर्सची संख्या ही 23.3 कोटी झाली आहे.
MrBeast विषयी माहिती
जिमी डोनाल्डसनचा जन्म 7 मे 1998 झाला होता. एक अमेरिकन YouTuber तो प्रसिद्ध आहे. त्याला मिस्टर बीस्ट (MrBeast) म्हणूनही ओळखले जाते. मिस्टर बीस्ट हे आज जगातील सर्वात मोठ्या YouTube चॅनेलपैकी एक आहे. MrBeast ने वयाच्या 25 व्या वर्षी यूट्यूबवरून करोडोंची कमाई केली आहे. मिस्टरबीस्टने 2012 मध्ये वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा पहिला व्हिडिओ YouTube वर अपलोड केला होता. सुरुवातीला तो यूट्यूब वरून पैसे कसे कमवायचे, त्याच्या टिप्स आणि युक्त्या इत्यादी मूलभूत विषयांवर YouTube व्हिडिओ बनवत होता.
महत्त्वाच्या बातम्या:
Armaan Malik : युट्यूबर अरमान मलिक पाचव्यांदा होणार बाबा; दुसरी पत्नी कृतिका मलिकने दिली गुडन्यूज