Success Story : अलिकडच्या काळात अनेक तरुण वेगवेगळ्या व्यवसायात उतरत आहेत. नोकरीच्या (Job) मागे न लागता यशस्वी उद्योजक बनत आहेत. तर काही तरुण हातची नोकरी सोडून उद्योग व्यवसाय (business) करत आहेत. अशाच काही तरुणांनी एक वेगळा व्यवसाय सुरु केलाय. सध्या त्यांची सर्वत्र चर्चा सुरुय. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनवरुन गायी-म्हशींची होम डिलिव्हरी (home delivery of cows and buffaloes) करु शकता. कारण काही तरुणांनी एकत्र येऊन करोडो रुपयांचं पॅकेज असणारी नोकरी सोडून गायी आणि म्हशींची होम डिलिव्हरी सुरु केलीय. ही गायी-म्हशींची होम डिलीवरी करणारी देशातील पहिली कंपनी आहे. 


आता तुम्ही मेरा पशु 360 च्या ॲप किंवा वेबसाइटद्वारे घरी बसून गायी आणि म्हशींची खरेदी करू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही घरबसल्या Myntra आणि Flipkart वरून तुम्हाला आवश्यक वस्तू ऑर्डर करता, त्याचप्रमाणे तुम्ही गायी आणि म्हशींची खरेदी करु शकता. गायी आणि म्हशींची होम डिलिव्हरी करणारी ही देशातील पहिली कंपनी असल्याचा दावा सह-संस्थापक निकेत यांनी केला आहे. अलीकडच्या काळात लोक घरी बसून सर्व काही ऑर्डर करत आहेत. जेणेकरुन त्यांना बाहेर जावे लागणार नाही. घरपोच सामान सहज मिळू शकेल. मग ते कपडे असोत, भाजीपाला, घरगुती रेशन, दूध असो किंवा इतर कोणतीही वस्तू असो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, आता तुम्हाला फक्त दूधच नाही तर गाई-म्हशींचीही घरी बसून खरेदी करता येईल. आजच्या बदलत्या काळात हेही शक्य झाले आहे. आता तुम्ही घरबसल्या तुमच्या फोनवरून गायी-म्हशींची होम डिलिव्हरी घेऊ शकता. 


करोडो रुपयांची नोकरी सोडून व्यवसाय सुरु 


निकेत, कनुप्रिया, प्राची आणि रुपीश हे चौघे जण मोठमोठ्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत होते. हे सर्वजण करोडो रुपये सहज कमवत होते. पण काहीतरी वेगळं करण्याची इच्छा या लोकांच्या मनात होती.  त्यानंतर या सर्वांनीच आपलं काम सोडून मेरा पशु 360 या नावाने काम सुरू केले. गायी आणि म्हशींची होम डिलिव्हरी करणारी ही देशातील पहिली कंपनी असल्याचा दावा सह-संस्थापक निकेत यांनी केला आहे. मेरा पशु 360 च्या ॲप किंवा वेबसाइटद्वारे, शेतकरी घरी बसून गायी आणि म्हशी खरेदी करू शकता. ज्याप्रमाणे तुम्ही घरबसल्या Myntra आणि Flipkart वरून तुम्हाला आवश्यक वस्तू ऑर्डर करता तशाच पद्धतीनं तुम्हाला खरेदी करता येणार आहे. 


गाई-म्हशी खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक होते


देशात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी मोठी बाजारपेठ आहे. गाय आणि म्हशीच्या दुधावर करोडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. दुग्धव्यवसायातून देशात भरघोस नफा मिळतो. मात्र, या क्षेत्रात गाई-म्हशी खरेदी करताना शेतकऱ्यांचीही फसवणूक होते असे निकेत यांनी सांगितलं. म्हैस एका दिवसात 10-15 लिटर दूध देते असे अनेक वेळा खरेदी करण्यापूर्वी त्यांना सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात म्हैस एका दिवसात 4 ते 5 लिटरही दूध देऊ शकत नाही. अशा स्थितीत खरेदी करणाऱ्याचे मोठे नुकसान होते. दरम्यान, निकेत यांची टीम 75 पेक्षा जास्त पॅरामीटर्सवर गायी म्हशींची चाचणी करते आणि त्यानुसार किंमत ठरवते.


कशी केली जाते प्राण्यांची तपासणी? 


तज्ज्ञ प्रथम प्राण्यांचे डोळे तपासतात. मग लांबी आणि रुंदी तपासतात. त्यानंतर प्राण्यांच्या शिंगांचा आकार, त्यानंतर कासेची तपासणी केली जाते. यानंतर गायी म्हशी विक्रीसाठी ठेवल्या जातात. निकेत आणि त्यांची टीम गायी म्हशींसाठी चारा देखील तयार करते. ही टीम विविध ठिकाणी शेतात जातात, शेतकऱ्यांच्या भेटी घेतात.  My Animal 360 कॉर्पोरेट ऑफिस बाकीच्यांपेक्षा वेगळे आहे. महिलांची संख्याही येथे सर्वाधिक आहे. येथे काम करणाऱ्या बहुतांश महिला शेतकरी कुटुंबातील आहेत. एवढेच नाही तर ती शेतकऱ्यांशी त्यांच्या स्थानिक भाषेत बोलतात. बहुतांश मुली या शेतकरी कुटुंबातून येतात.


4 राज्यात कंपनीचं काम सुरु


दरम्यान, तरुणांनी सुरु केलेलं गायी म्हशी विक्रीचं स्टार्टअप शेतकरी आणि शेतकरी कुटुंबातील महिलांना सक्षम करण्यासाठी काम करत आहे. कंपनी सुरू होऊन फक्त दोन वर्षे झाली आहेत. सध्या ही कंपनी 4 हून अधिक राज्यात पोहोचली आहे. कंपनी संपूर्ण देशात पसरण्याचे या तरुणांचे स्वप्न आहे. 


महत्वाच्या बातम्या:


भाग्यवान गाय!  एका गायीनं पालटलं कर्जबाजारी कुटुंबाचं नशीब, कसा घडला चमत्कार?